शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ढोल, नागारे आणि बासरी; नरेंद्र मोदींना आतापर्यंत या वाद्यांवर आजमावला हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 10:35 PM

1 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या परदेश दौऱ्यांदरम्यान नेहमीच चर्चेत असतात. देश असो वा विदेश त्यांच्या प्रत्येक कृतीची चर्चा होत असते. दरम्यान, आपल्या देश आणि परदेशातील दौऱ्यांमध्ये नरेंद्र मोदींनी विविध वाद्यांवर आपला हात आजमावून पाहिला आहे.
2 / 10
चीन दौऱ्यावेळी नरेंद्र मोदी यांनी चीनमधील ऐतिहासिक घंटा वाजवल्या होत्या. त्यावेळी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे त्यांच्यासोबत उपस्थित होते.
3 / 10
ईशान्य भारतातील मेघालयच्या दौऱ्यावेळी मोदींनी पारंपरिक ढोल वाजवला होता.
4 / 10
त्रिपुरा येथे गेल्यावरही मोदींनी पारंपरिक ढोल वाजवला होता. तसेच तेथील पारंपरिक वाद्ययंत्रही वाजवून पाहिले होते.
5 / 10
2014 मध्ये जपान दौऱ्यावेळी मोदींनी ड्रम वाजवला होता. मोदींचे हे ड्रमवादन चर्चेचा विषय ठरले होते.
6 / 10
जपान दौऱ्यावेळी मोदींनी सोपर्नो रेकॉर्डरही वाजवले होते.
7 / 10
2016 च्या टंझानिया दौऱ्यावेळी मोदींनी ड्रमवादन केले होते. त्यावेळी टंझानियाचे राष्ट्रपती जॉन मगुफली यांच्यासोबत त्यांची जुगलबंदी रंगली होती.
8 / 10
2015 च्या मंगोलिया दौऱ्यात नरेंद्र मोदींनी पारंपरिक वाद्य योची वाजवले होते.
9 / 10
मंगोलिया दौऱ्यावेळी मोदींनी गिटारही वाजवले होते.
10 / 10
2016 मध्ये आदिवासी महोत्सवावेळी नरेंद्र मोदींनी पारंपरिक ढोलक वाजवले होते.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत