शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नरेंद्र मोदींनी तिरुपती बालाजी मंदिरात केली पूजा, भगवान व्यंकटेश्वराला घातलं साकडं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:51 AM

1 / 8
तिरुपती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे तिरुपती बालाजी मंदिरात भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले.
2 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिरात पूजा केली, यासंबंधी फोटो त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंट वरून शेअर करण्यात आले आहेत.
3 / 8
नरेंद्र मोदींनी ट्विट करून म्हटले की, '१४० कोटी भारतीयांच्या समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी भगवान व्यंकटेश्वराला प्रार्थना केली.'
4 / 8
रविवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे पोहोचले होते.
5 / 8
त्यावेळी राज्यपाल एस अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी त्यांचे स्वागत केले.
6 / 8
नरेंद्र मोदी रस्त्याने तिरुमला येथे पोहोचले तेव्हा मार्गात ठिकठिकाणी लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या आणि पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.
7 / 8
दरम्यान, तिरुमला दौऱ्यानंतर लवकरच नरेंद्र मोदी तेलंगणात पुन्हा प्रचार करणार आहेत. त्यांचा रोड शो दुपारी ४ वाजता सुरू होईल.
8 / 8
याआधी नरेंद्र मोदी दुपारी १२ वाजता महबूबाबाद आणि दुपारी २ वाजता करीमनगरमध्ये जाहीर सभांना संबोधित करतील.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Andhra Pradeshआंध्र प्रदेशTelanganaतेलंगणाElectionनिवडणूकtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट