शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' अॅडव्हान्स विमानातून अमेरिकेला गेलेत नरेंद्र मोदी, काय आहे विमानाची खासियत...?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 9:28 PM

1 / 6
नवी दिल्ली: तुम्हाला माहिती का, ज्या विमानात पंतप्रधान आणि राष्ट्रपती प्रवास करतात ते किती खास ? सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनात कोविंद 'एअर इंडिया वन' या विमानातून प्रवास करतात. पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर याच हायटेक 'एअर इंडिया वन' विमानानं गेले आहेत. पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमध्ये QUAD परिषदेसाठी आणि न्यूयॉर्कमध्ये UNGC मध्ये संबोधन करण्यासाठी अमेरिकेला गेले आहेत. जाणून घेऊया पंतप्रधान मोदींच्या या विमानात काय विशेष आहे?
2 / 6
नॉन-स्टॉप उड्डाण घेण्यास सक्षम- आत्तापर्यंत, जितके भारतीय पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले, त्यांच्या विमानाला फ्रँकफर्टमध्ये हॉल्ट घ्यावा लागायचा. पण आताच्या 'एअर इंडिया वन'ला कुठेच थांबा घेण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विमानातून विनाथांबा थेट वॉशिंग्टनला गेले आहेत.
3 / 6
अॅट्रॅक्टिव्ह लूक- 'एअर इंडिया वन'ला आकर्षक लूक देण्यात आला आहे. बाहेरील बाजूस एका बाजूला अशोक चिन्ह बनवले आहे. तसेच, दुसऱ्या बाजूला दरवाजावर हिंदीत 'भारत' आणि दुसरीकडून इंग्रजीमध्ये 'INDIA' लिहीलेलं आहे. तसेच, खालील बाजुस भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे.
4 / 6
आतील भाग कसा आहे ?- विमानाच्या आत एक कॉन्फरन्स रुम, व्हीव्हीआयपी प्रवाशांसाठी एक केबिन, आपत्कालीन वैद्यकीय केंद्र तसेच इतर मान्यवर आणि कर्मचाऱ्यांसाठी जागा आहेत. एअर इंडिया वनची एक खासियत म्हणजे एकदा इंधन भरले की हे विमान 17 तास सतत उड्डाण करू शकतं.
5 / 6
कमालीची सिक्योरिटी- या विमानात अॅडवांस्ड इलेक्ट्रॉनिक वारफेयर सूट आहे, जो फक्त विमानाला इतर हल्ल्यांपासून वाचवत नाही, तर प्रत्युत्तर देण्यासह सक्षम आहे. याशिवाय, विमानात सेल्फ-प्रोटेक्शन सूट (SPS) असल्यामुळे शत्रुंचे सिग्लन जाम करण्यासह क्षेपणास्त्रांची दिशाही बदलू शकतो.
6 / 6
ट्विन इंजन- वायुसेनेच्या विमानांप्रमाणे या विमानाची रेंजही जास्त आहे. याशिवाय, इंधन संपल्यावर हवेतून रीफ्यूलींगही करता येते. तसेच, विमानात शक्तीशाली ट्विन GE90-115 इंजिन असल्यामुळे विमान 559.33 मैल प्रती तासांच्या वेगाने उडू शकतं.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाAir Indiaएअर इंडिया