Narendra Modi's chai pe discussion with Eknath Shinde in delhi G20 summit, CM presents book
मोदींची मुख्यमंत्री शिंदेंसोबत 'चाय पे चर्चा', पंतप्रधानांना भेट दिलं 'हे' पुस्तक By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 12:16 PM1 / 9१ डिसेंबर २०२२ रोजी भारताने जी२० या जगातील राष्ट्रसमुहांच्या गटाचे अध्यक्षपद अधिकृतपणे स्वीकारले. याअनुषंगाने राष्ट्रपती भवन येथील कल्चरल सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीचं आयोजन केलं होतं. 2 / 9मोदींच्या अध्यक्षतेखाली राज्यांचे मुख्यमंत्री व संसदेचे प्रतिनिधित्व करणारे पक्षांचे अध्यक्षांसोबत ही बैठक घेण्यात आली. त्यानंतर, पंतप्रधानांनी सर्वच राज्याच्या मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांशी चर्चाही केली. 3 / 9महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या बैठकीला हजेरी लावून महाराष्ट्रात होणाऱ्या १४ बैठकांच्या नियोजनाचे सादरीकरण केले. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चाय पे चर्चाही केली. 4 / 9संपूर्ण देशभरात यानिमित्ताने १६१ हून अधिक बैठकांचे आयोजन करण्यात येणार असून यातील १४ बैठका महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणार आहेत. याप्रसंगी उपस्थित राहून G20 शिखर परिषदेच्या बैठकांच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्याच्या वतीने महत्वपूर्ण सुचनांचे सादरीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत केले.5 / 9यावेळी, मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गतीमान महाराष्ट्र नावाचे पुस्तकही भेट दिले. या पुस्तकात शिंदे-फडणवीस सरकारच्या गेल्या ४ महिन्यातील कार्याचा आढावा असल्याचे समजते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही हे पुस्तक भेट देण्यात आले. 6 / 9दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही भेट घेत संवाद साधला. 7 / 9नरेंद्र मोदींच्या हातात चहाचा कप दिसून येत आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या हातातील पुस्तकाची माहिती त्यांना सांगत आहेत. 8 / 9पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीदरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशीही संवाद साधला. 9 / 9दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पाहताच हात जोडले, तर शेजारीत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हात बांधून उभ्या असल्याचं दिसून येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications