देवभूमीतील कैलास पर्वतावर मोदींचा हटके लूक; पार्वती कुंडाचे घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 12:14 IST
1 / 9पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी देवभूमी उत्तराखंडच्या पिथौरागड येथे जाऊन दर्शन घेतले. येथील पार्वती कुंडमध्ये जाऊन त्यांनी पूजा-आरती केली. 2 / 9यावेळी, मोदींचा विशेष हटके लूक पाहायला मिळाला. तर, पंतप्रधानांनी डमरु आणि घंटाही वाजवला. येथील दर्शनानंतर मोदी हे गुंजी गावात जाणार आहेत. 3 / 9तेथे सैन्य दलाच्या जवानांसह आयटीबीपी आणि बीआरओंसह स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत.4 / 9मोदींनी आज सकाळी जोलिंगकोंग येथे जाऊन प्रभू कैलास यांची पूजा अर्चना केली. यावेळी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेही मोदींसमवेत उपस्थित होते. 5 / 9नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी उत्तराखंड येथील कैलास पर्वतरागांचे दर्शन घेतले. भारत आणि चीनच्या सीमारेषेवर हे कैलास पर्वत आहेत. 6 / 9येथून २० किमीच्या अंतरावर चीनची सीमा सुरू होते. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या पर्वत दर्शनाचे फोटो शेअर केले आहेत. 7 / 9 दरम्यान, दुपारी २ वाजताच्या सुमारास मोदी पिथौरगड येथे जाणार असून येथील पायाभूत सुविधांसंबंधित जवळपास ४२०० कोटींच्या विविध विकास योजनांचे उद्घाटन करणार आहेत. 8 / 9पंतप्रधान नरेंद्र मोदी अल्मोडातील जागेश्वर धाम येथील मंदिरातही पोहोचणार आहेत. 9 / 9जवळपास ६२०० फूट उंचीवर असलेल्या जागेश्वर धाममध्ये अंदाजे २२४ प्रकारच्या दगडांचे मंदिर आहेत.