शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्त्री-पुरुष सारे समान, कान तुटल्यास बनते जिवंत समाधी, नाथ संप्रदायातील अजब परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 4:08 PM

1 / 8
हिंदू धर्मामध्ये अनेक संप्रदाय आणि पंथ आहेत. त्यामध्ये जन्म संस्कारापासून अंत्यसंस्कारापर्यंत होणारे संस्कार वेगवेगळे असतात. असाच एक संप्रदाय आहे नाथ संप्रदाय. त्यामध्ये योगी जिवंत समाधी घेतात.
2 / 8
नाथ संप्रदायाचा योगी बनण्याचा मार्ग खडतर आहे. त्यासाठी ४१ दिवस पडद्यामध्ये राहावे लागते. तसेच ९ दिवसांपर्यंत आंघोळ न करता अघोरी क्रिया करावी लागते. या दरम्यान, गुरू जे खायला देईल ते खावं लागतं. त्यानंतर दीक्षा मिळते. नाथ संप्रदायातील दीक्षेनंतर पुरुष आणि महिलेमध्ये फरक केला जात नाही. नाथ संप्रदायातील योगी अग्नीक्रियेमधून योगच्या माध्यमातून स्वत:ला अधिक शुद्ध मानतात. त्यामुळे या संप्रदायातील लोकांचं दहन होत नाही.
3 / 8
नाथ संप्रदायामध्ये एखा पुरुष योगी पुरुषालाच दीक्षा देऊ शकतो. तर एक महिला योगी एका महिलेला दीक्षा देऊ शकते. जे नियमांचं पालन करत नाहीत त्यांना संप्रदायामधून बाहेरचा रस्ता दाखवला जातो.
4 / 8
नाथ संप्रदाय भगवान शिवाचे उपासक आहे. जिथे योगी बनण्यासाठी कर्णभेदन करणे अनिवार्य असते. एवढेच नाही तर या संप्रदायामध्ये अनेक मोठे नियमसुद्धा आहेत.
5 / 8
साधनेमध्ये लीन असलेल्या योगींमध्ये शिवशंकराची काया असल्याचे मानले जाते. अशामध्ये एक गुरूसुद्धा आपल्या शिष्याला ४० दिवसांपर्यंत नमस्कार करतात. कानावर छेद केल्यानंतर योगी व्यक्तीला आपल्या जखमी कानाची काळजी घ्यावी लागते. जर कान खंडित झाला तर साधक नाथ संप्रदायातून बहिष्कृत मानले जाते.
6 / 8
दीक्षेसाठी परिधान केलेल्या कुंडल असलेल्या कानामध्ये चिरेच्या जागांवर दररोज लिंबाची पाने टाकून उकळलेल्या पाण्याने स्वच्छता केली जाते. घाव भरण्यासाठी त्यामध्ये कबुतराच्या पिसाने मोहरीचे तेल लावले जाते.
7 / 8
मात्र मृत्यूनंतर पुन्हा एकदा कानात मातीची कुंडले घातली जातात. तर नाथ संप्रदायामध्ये एक अजब परंपरा आहे. त्यामध्ये जर कुंडले घातलेल्या योग्याचा कान कापला गेला तर त्याला जिवंत समाधी दिली जाते.
8 / 8
नाथ संप्रदायामध्ये योगी बनण्यासाठी कर्णभेदन संस्कार केला जातो. तसेच पुन्हा एक वर्षापर्यंत मातीची कुंडले कानात घातली जातात. एक वर्षानंतर योगी वाटल्यास पितळ किंवा चांदीची कुंडले घालू शकतो. कानाचं छेदन न झालेल्या साधूंना ओघड म्हटले जाते. त्यांचा अर्धा मान असतो.
टॅग्स :HinduismहिंदुइझमIndiaभारत