National Farmers Day 2021, Kisan Diwas 2021, Whys Is Kisan Diwas Celebrated On 23rd December
National Farmers Day : आज 'राष्ट्रीय शेतकरी दिवस' का साजरा केला जातो? जाणून घ्या, इतिहास... By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 10:50 AM1 / 8भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा 'शेती' हा कणा आहे. शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवतो. आज म्हणजेच 23 डिसेंबरला देशभरात 'राष्ट्रीय शेतकरी दिवस' साजरा केला जात आहे. यानिमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांच्या योगदानासाठी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पण, 23 डिसेंबरलाच का साजरा केला जातो, हा 'राष्ट्रीय शेतकरी दिवस' त्याबद्दल जाणून घेऊया....2 / 8भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांचा वाढदिवस (23 डिसेंबर) 'राष्ट्रीय शेतकरी दिवस' म्हणून साजरा केला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंह यांनी भरीव कामगिरी केली आहे. चरण सिंह यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना केली. 3 / 8भारतीय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याचे श्रेय चौधरी चरण सिंह यांना जाते. शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकर्यांच्या समस्या आणि परिस्थितीची चांगली जाण होती, त्यामुळे त्यांनी शेतकर्यांसाठी अनेक सुधारणा केल्या. दरम्यान, अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 4 / 8शेतकऱ्यांचा आवाज संसदेत बुलंद करणारे शेतकरी नेते भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी चौधरी चरण सिंह यांनी अनेक कामे केली गोती. देशाच्या संसदेत शेतकऱ्यांसाठी चौधरी चरण सिंह आवाज बुलंद केला होता. चौधरी चरण सिंह हे 28 जुलै 1979 पासून 14 जानेवारी 1980 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते.5 / 8चौधरी चरण सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. यादरम्यान चौधरी चरण सिंह यांनी अनेक महत्त्वाची कामे केली. त्यांनी तयार केलेला जमीनदारी उन्मुलन विधेयक राज्याच्या कल्याणकारी सिद्धांतावर आधारित होता. यामुळे उत्तर प्रदेशात एक जुलै 1952 पासून जमीनदारीची प्रथा संपली. याचबरोबर, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी लेखापद पद बनवले. त्यानंतर ते उपपंतप्रधान बनले आणि मग पंतप्रधानपदी विराजमान होऊन देशाची सेवा केली.6 / 8 चौधरी चरण सिंह यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव चौधरी मीर सिंह होते. चौधरी चरण सिंह लहान असतानाच त्यांचे कुटुंब जानी परिसरात स्थायिक झाले. त्यांनी आग्रा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले होते. यानंतर गाझियाबादमध्ये काही काळ वकिली केली होती. महात्मा गांधींजींचा त्यांच्यावर प्रभाव होता.7 / 8उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते चौधरी चरण सिंह त्यांनी गाझियाबादमध्ये काँग्रेस समिती स्थापन केली होती. गांधीजींनी मीठासाठी केलेल्या दांडी यात्रा काढली होती तेव्हा चरण सिंह यांनीही हिंडनमध्ये मीठाचा कायदा मोडला होता. यासाठी सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा देशसेवेच्या कामात सक्रिय झाले.8 / 8दरम्यान, देशाच्या प्रगतीत शेतकर्यांचे मोठे योगदान आहे, त्यामुळे शेतकर्यांना सन्मान दिला पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते. शेतकऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करणे हा या विशेष दिवसाचा उद्देश आहे. यानिमित्ताने देशात शेतकरी जागृतीपासून अनेक कार्यक्रम होतात. जगातील इतर देशांमध्ये शेतकरी दिवस कधी साजरा केला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications