राष्ट्रीय युद्ध स्मारक...! By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 4:49 PM
1 / 8 देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी नवी दिल्लीत उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्धाटन सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. 2 / 8 राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती करण्याबाबत 1968 मध्ये चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात 2015 मध्ये या स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली. 3 / 8 राष्ट्रीय युद्ध स्मारकाऐवजी याठिकाणी एक संग्रहालयही बांधण्यात आले आहे. या ठिकाणी भिंतीवर 25 हजार 942 शहीदांची नावे लिहिण्यात आली आहेत. 4 / 8 राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या भिंतीवर युद्धाशी संबंधित कलाकृती लावण्यात आल्या आहेत. यात सियाचिनसह कारगिल युद्धादरम्यान टायगर हिल ताब्यात घेतलेली क्षणचित्रे आहेत. 5 / 8 पहिल्या महायुद्धात भारताच्या 84 हजार शहीद जवानांच्या स्मरणार्थ इंग्रजांनी इंडिया गेट उभारले होते. त्यानंतर 1971 च्या युद्धातील 3 हजार 843 शहीद जवांनांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती स्मारक बांधण्यात आले होते. 6 / 8 राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे एक मोबाईल अॅपही लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये शहीदांचे नाव टाईप करुन त्यांचे स्मारक कुठे आहे याची माहिती मिळते. 7 / 8 मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यासाठी 176 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 8 / 8 मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यासाठी 176 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. आणखी वाचा