शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देवभूमीत निसर्गाचे तांडव, मुसळधार पाऊस, वीज कोसळून प्रचंड नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 2:17 PM

1 / 6
गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागात पावसाचा जोर वाढत आहे. एकीकडे बिहार, आसाममध्ये पुरामुळे चिंताजनक परिस्थिती उदभवली असताना आता देवभूमी उत्तराखंडमध्ये निसर्गाचे तांडव पाहायला मिळाले.
2 / 6
उत्तराखंडमधील पिथौरागड परिसरात ढगफुटी झाल्याने भूस्खलन झाले आहे. तर हरिद्वारमधील हर की पौडी येथे वीज कोसळून मोठे नुकसान झाले. हरिद्वारमधील हर की पौडी येथे वीज कोसळल्यामुळे ८० फुटांची भिंत कोसळली. ही दुर्घटना ब्रह्मकुंडजवळ घडली.
3 / 6
संपूर्ण उत्त भारतात मान्सूनचा जोर दिसून येत आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हर की पौडी येथे वीज कोसळल्यामुळे भलीमोठी भिंत कोसळली. या दुर्घटनेची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
4 / 6
दरम्यान, ही दुर्घटना घडल्यानंतर आघाडा परिषदेचे श्रीमहंत नरेंद्र गिरी पाहणी करण्यासाठी हर की पौडी येथे पोहोचले आणि त्यांनी तिथे परिस्थितीचा आढावा घेतला. आता प्रशासनाकडून घटनास्थळावरून ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.
5 / 6
हर की पौडी येथे श्रावण महिन्यात नेहमीच गर्दी असते. मात्र यावेळी कोरोनाच्या संकटामुळे कांवडीयांना मनाई करण्यात आली आहे. मात्र स्थानिक भाविक हरिद्वार येथे येत आहेत.
6 / 6
उत्तर भारतात गेल्या काही दिवसांत वीज कोसळून अनेक दुर्घटना झाल्या आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागात वीज कोसळून शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
टॅग्स :RainपाऊसNatureनिसर्गIndiaभारत