शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सुरक्षा दलांवर हल्ल्यासाठी नक्षलवाद्यांनी बॉम्ब पेरले, अचानक स्फोट होऊन त्यांचेच काम तमाम झाले

By बाळकृष्ण परब | Published: February 26, 2021 4:51 PM

1 / 6
करावे तसे भरावे अशी एक म्हण आहे. छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित भागात नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. छत्तीसगडमधील कांकेंर जिल्ह्यातील आमाबेडा पोलीस ठाणे क्षेत्रात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवाद्यांनी बॉम्ब पेरत होते. मात्र यादरम्यान एक बॉम्ब फुटला आणि त्या स्फोटात नक्षलवाद्यांच्या चिंधड्या उडाल्या.
2 / 6
हा बॉम्ब एवढा शक्तिशाली होता की, त्यामध्ये डीव्हीसी मेंबरच्या चिंधड्या उडून त्याच्या शरीराचे अवशेष झाडावर जाऊन अडकले. तर दोन नक्षलवादी जबर जखमी झाले.
3 / 6
या घटनेबाबत नक्षलवाद्यांनी एक पत्रकही प्रसिद्ध केले आहे. तसेच बॅनर लावले आहेत. त्यात नक्षलवाद्यांनी म्हटले आहे की, १८ फेब्रुवारी रोजी अमाबेदाच्या चुकपाल गावात पहाटे ६.१५ वाजता एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत डीव्हीसी सदस्य सोमाजी उर्फ सहदेव वेडदा याचा मृत्यू झाला.
4 / 6
हे पत्रक उत्तर बस्तर डिव्हिजनल कमिटीचे प्रवक्ते सुखदेव कावडे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी बॉम्ब पेरताना स्फोट झाल्याचे म्हटले आहे.
5 / 6
चुकपालच्या या परिसरात जिथे हा स्फोट झाला तिथे आजूबाजूला एकसाथ अनेक प्रेशर बॉम्ब लावण्यात आले होते. स्फोट झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी हे बॉम्ब काढून घेतले. आता बॉम्ब लावलेल्या ठिकाणी छोटे छोटे खड्डे मिळाले आहेत. याशिवाय बॉम्बच्या ताराही मिळाल्या आहेत.
6 / 6
मिळालेल्या माहितीनुसार येथून काही अंतरावर बोडागाव येथे बीएसएफचा कॅम्प आहे. तिथे गस्त घालण्यासाठी निघणारे जवान हे परत कॅम्पच्या जवळ येताना काहीसे निश्चिंत होतात. तसेच कॅम्पच्या बाहेर जागा पाहून बसतात आणि आराम करतात. त्यांना लक्ष्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बॉम्ब लावले होते.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिसChhattisgarhछत्तीसगड