1 / 14भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक लेहला भेट देऊन भारतीय जवानांचं धाडसाचं कौतुक केलं आणि चीनला सज्जड इशारा दिला.2 / 14गलवान खोऱ्यात भारतमातेच्या शत्रूंनी तुमच्यातील आग आणि संताप पाहिला आहे, आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्हाला कुणी दुबळं समजू नये, अशा शब्दांत त्यांनी भारतीय लष्कराचा मनोधैर्य वाढवलं.3 / 14मोदींनी निमू या सीमेवरील ठाण्याला भेट दिली. त्यानंतर लष्कराच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून ते लष्कर, हवाई दल आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस कर्मचाऱ्यांना भेटले.4 / 14गलवान खोऱ्यातील झटापटीत जखमी झालेल्या जवानांची मोदींनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. 5 / 14पंतप्रधानांच्या या 'सरप्राईज व्हिजिट'चं एकीकडे भरभरून कौतुक होत असतानाच, काँग्रेसचे काही नेते आणि टीकाकारांनी या हॉस्पिटलभेटीवरून मोदींना लक्ष्य केलं. ट्विटरवर #MunnabhaiMBBS हा हॅशटॅग ट्रेंड झाला.6 / 14कुठल्याही रुग्णाला बँडेज नाही, सलाईन नाही, ऑक्सिजन सिलेंडर नाही की कुठली औषधंही नाहीत, हे तर मुन्नाभाईमधलंच हॉस्पिटल आहे, अशी खिल्ली उडवण्यात आली.7 / 14दिल्ली प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिषेक दत्त यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.8 / 14काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हॉस्पिटलभेट आणि नरेंद्र मोदींची हॉस्पिटलभेट यांची तुलना केली.9 / 14काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हॉस्पिटलभेट आणि नरेंद्र मोदींची हॉस्पिटलभेट यांची तुलना केली.10 / 14काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हॉस्पिटलभेट आणि नरेंद्र मोदींची हॉस्पिटलभेट यांची तुलना केली.11 / 14काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हॉस्पिटलभेट आणि नरेंद्र मोदींची हॉस्पिटलभेट यांची तुलना केली.12 / 14काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हॉस्पिटलभेट आणि नरेंद्र मोदींची हॉस्पिटलभेट यांची तुलना केली.13 / 14या प्रकाराची गंभीर दखल घेऊन, मोदींवर आणि अप्रत्यक्षपणे लष्कराच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होत असलेले आरोप अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी असल्याची चपराक त्यांनी लगावली आहे.14 / 14कोरोना संकटाच्या काळात लेह येथील सामान्य रुग्णालयात काही बदल करण्यात आले आहेत. एका प्रशिक्षण हॉलचं रुपांतर रुग्णालयात करण्यात आलंय. गलवान खोऱ्यात शत्रूशी लढताना जखमी झालेल्या जवानांना करोनाची बाधा होऊ नये म्हणून या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या हॉस्पिटलवर आणि जवनांना दिल्या जाणाऱ्या ट्रिटमेंटवर जी टिप्पणी झाली, ती खेदजनक आहे, असं लष्कराने नमूद केलंय.