शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हुबेहूब या मंदिराप्रमाणे असेल नवे संसद भवन, नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने केला होता तोफांचा मारा

By बाळकृष्ण परब | Published: December 16, 2020 9:49 AM

1 / 6
सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत केंद्र सरकारने नवे संसद भवन बांधण्याचे नियोजन केले असून, नव्या संसदभवनाच्या इमारतीचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले आहे. या नव्या इमारतीच्या प्रतिकृतीची छायाचित्रे समोर आली आहे.
2 / 6
दरम्यान, मध्य प्रदेशमधील विदिशा येथील विजय मंदिर आणि भारताच्या नव्या संसद भवनाची छायाचित्रे सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. नव्या संसद भवनाचे छायाचित्र पाहून ते अमेरिकेच्या पेंटॅगॉनची नक्कल असल्याचे काही युझर्स म्हणत आहेत. मात्र नव्या संसद भवनाची नियोजित इमारत ही विदिशामधील विजय मंदिराशी मिळतीजुळती असल्याचे दिसत आहे.
3 / 6
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या नव्या संसद भवनाची आकृती ही विदिशामधील बिजा मंडल म्हणजेच विजय मंदिराशी हुबेहूब मिळती जुळती आहे. हे भव्य विजय मंदिर त्रिभूजाकारा आहे. मंदिराचा उंच बेस पाहून त्याचा आकार आणि नव्या संसद भवनाची आकृती एकसारखी दिसत आहे.
4 / 6
विदिशामधील हे भव्य मंदिर मुघलांनी तोडले होते. या मंदिराचे बांधकाम परमार काळामध्ये परमार राजांनी केले होते. त्यानंतर पुढच्या काळात औरंगजेबाने हे मंदिर उद्ध्वस्त केले होते. आता हे मंदिरा बीजा मंडल एएसआयच्या संरक्षणाखाली आहे. तसेच या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे.  
5 / 6
इतिहासकारांच्या मते औरंगजेबाने हे मंदिर १६८२ मध्ये तोफांचा मारा करून उद्ध्वस्क केले होते. त्यानंतर माळवा मराठ्यांनी जिंकल्यानंतर हे मंदिर नव्याने उभारण्याचा प्रयत्न मराठ्यांनी केला होता. या मंदिराची उंची १०० मीटरच्या आसपास आहे. तसेच सुमारे अर्धा मैल परिसरात हे मंदिरा विस्तारलेले आहे.
6 / 6
देशाचे सध्याचे संसद भवन हे मुरैना येथील ६४ योगिनी मंदिराशी मिळतेजुळते आहे. तर नवे संसद भवनसुद्धा मध्य प्रदेशमधील विदिशा येथील विजय मंदिरावर आधारलेले असल्याचे दिसत आहे.
टॅग्स :ParliamentसंसदIndiaभारत