New Parliament Building:96 years of history, what will happen to the old parliament building ?
96 वर्षांचा इतिहास, 6 एकराचा परिसर...इंग्रजांनी बांधलेल्या जुन्या संसद भवनाचे काय होणार? By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 8:24 PM1 / 5 New Parliament Building: नवीन संसद भवनाची इमारत तयार झाली असून, 28 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अशावेळी संसद भवनाच्या जुन्या इमारतीचे काय होणार, हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. ज्या वास्तूत देशाची निर्मिती झाली, महत्वाचे कायदे झाले, देशाचा इतिहास घडला, अशा जुन्या इमारतीचे काय होणार?2 / 5 याच इमारतीतून देशाची राज्यघटना अस्तित्वात आली होती. संसद भवनाच्या समृद्ध वारशाचे जतन करणे ही अति महत्त्वाची बाब आहे. मुळात जुन्या संसद भवनाला कौन्सिल हाऊस म्हणतात. संसदेची जुनी इमारत कौन्सिल हाऊस म्हणून वापरली जात होती आणि नंतर तिचे संसद भवनात रूपांतर करण्यात आले. पण, संसदेप्रमाणे त्याची रचना कधीच झाली नव्हती. या इमारतीत इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आहे आणि ती भारताच्या लोकशाहीचा आत्मा मानली जाते. 3 / 5 जुन्या संसद भवनाची रचना ब्रिटिश आर्किटेक्ट सर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केली होती. ही इमारत तयार करण्यासाठी सहा वर्षे लागले आणि ही 1927 मध्ये पूर्ण झाली. 1956 मध्ये संसद भवन इमारतीत आणखी दोन मजले बांधण्यात आले. 2006 मध्ये या इमारतीत संसद संग्रहालय देखील बांधण्यात आले, जिथे देशाचा 2500 वर्षांचा समृद्ध लोकशाही वारसा दाखवण्यात आला आहे.4 / 5 मार्च 2021 मध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत सांगितले की, जेव्हा नवीन संसदेची इमारत तयार होईल, तेव्हा जुन्या इमारतीची दुरुस्ती करून पर्यायी वापर करावा लागेल. परंतु जुन्या संसद भवनाचा वापर कशासाठी केला जाणार आहे, याचा विचार अद्याप करण्यात आला नाही. 5 / 5 सरकारच्या म्हणण्यानुसार जुने संसद भवन पाडले जाणार नाही. देशाची संपत्ती असल्याने त्याचे जतन केले जाईल. संसदेशी संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी या इमारतीचा वापर केला जाणार आहे. 2022 च्या एका रिपोर्टनुसार, जुन्या संसद भवनाचे संग्रहालयात रूपांतर केले जाऊ शकते. सेंट्रल व्हिस्टाच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ही केंद्र सरकारची योजना आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications