शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

New Rules From December 2022: उरले काही दिवस! १ डिसेंबरपासून होणार 'हे' बदल; जाणून घ्या सविस्तर, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 7:57 PM

1 / 10
डिसेंबर महिना यायला अवघे काही दिवस उरले आहेत. प्रत्येक महिन्यात काही ना काही नवीन बदल होतात. अशा परिस्थितीत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला काही बदल होणार आहेत. या बदलांचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईल, त्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
2 / 10
डिसेंबर महिन्यापासून एटीएममधून पैसे काढण्याची पद्धत बदलू शकते. याशिवाय एलपीजी, पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीत बदल होऊ शकतो. पेन्शनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास १ डिसेंबरपासून अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
3 / 10
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. अशा स्थितीत यंदा १ डिसेंबरपासून एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची शक्यता आहे.
4 / 10
ऑक्टोबर महिन्याच्या आकडेवारीवरून किरकोळ महागाई दरात दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. यानंतर या महिन्याच्या अखेरीस पेट्रोलियम कंपन्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत बदल करण्याची घोषणाही करू शकतात. मात्र, तसे होणार की नाही, हे १५ डिसेंबरच्या सकाळपर्यंतच स्पष्ट होणार आहे. याशिवाय सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदलही जाहीर केला जाऊ शकतो.
5 / 10
डिसेंबर महिन्यापासून एटीएममधून पैसे काढण्याची पद्धतही बदलू शकते. सध्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आपण जी पद्धत वापरतो, त्यामुळे अनेक वेळा फसवणूक होण्याची शक्यता असते. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँक डिसेंबर महिन्यात एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेत बदल करू शकते.
6 / 10
१ डिसेंबरपासून तुम्ही एटीएममध्ये कार्ड टाकताच तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी जनरेट होईल. एटीएम स्क्रीनवर दिलेल्या कॉलममध्ये हा ओटीपी टाकल्यानंतरच रोख रक्कम दिली जाईल. सध्या ही सेवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही एटीएम शाखांवर आहे.
7 / 10
डिसेंबर महिन्यात देशातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढू लागतो. धुके असल्याने रेल्वेच्या वाहतुकीत अडचणी येतात. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वेला घ्यावा लागतो. धुके पाहता रेल्वेनेही वेळापत्रकात बदल करते. यावेळीही रेल्वे डिसेंबर महिन्यात रेल्वेच्या वेळापत्रकात सुधारणा करेल आणि नव्या वेळापत्रकानुसार गाड्या चालवल्या जातील अशी अपेक्षा आहे.
8 / 10
पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे. त्यांनी या महिन्याच्या अखेरीस त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही, तर १ डिसेंबरपासून त्यांची गैरसोय होऊ शकते. जर जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही तर त्यांचे पेन्शन देखील थांबू शकते.
9 / 10
डिसेंबर महिन्यात एकूण १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यांचा समावेश आहे. या महिन्यात ख्रिसमस, वर्षाचा शेवटचा दिवस (३१ डिसेंबर) आणि गुरु गोविंद सिंग जी यांची जयंती देखील आहे.
10 / 10
सण उत्सावाच्या निमित्ताने बँकांना सुटी असणार आहे. अनेक राज्यांमध्ये स्थानिक सणांच्या आधारे सुटीही असते. सुट्टीच्या दिवशी बँका बंद राहतील. मात्र, या काळात ग्राहकांना त्यांचे काम ऑनलाइन बँकिंगद्वारे करता येणार आहे.
टॅग्स :bankबँकCylinderगॅस सिलेंडर