शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

New Year 2022 Holiday's: आतापासूनच करा 2022 मधील सुट्यांचे नियोजन; मिळतील इतके सलग हॉलिडे की....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 2:26 PM

1 / 8
2022 साल जवळ येत आहे. या येणाऱ्या वर्षात तुम्हाला 14 सराकारी आणि 30 इतर सुट्या मिळणार आहेत. यामध्ये प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, ख्रिसमस, बुद्ध पौर्णिमा, दसरा, दिवाळी, गुड फ्रायडे, गुरु नानक जयंती, ईद उल फित्र, ईद अल जुहा, महावीर जयंती, मोहरम आणि पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिवस यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सरकारने 12 ऐच्छिक सुट्ट्या दिल्या आहेत. यामध्ये रामनवमी आणि होळीचा समावेश आहे.
2 / 8
दरम्यान, तुम्ही पुढील वर्षी बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्या मनात प्रश्न येत असेल की 2022 मध्ये मोठ्या सुट्ट्या कधी मिळेतील? जानेवारी ते डिसेंबर या महिन्यात किती सुट्ट्या आहेत आणि तुम्ही सर्वात जास्त सुट्ट्या कधी घेऊ शकता? या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
3 / 8
कोणत्या महिन्यात सर्वाधिक सुट्ट्या आहेत ? ऑक्टोबरमध्ये बहुतांश सरकारी सुट्या असतात. गांधी जयंती ते दसरा, दिवाळी आणि ईद-ए-मिलाद देखील ऑक्टोबर 2022 मध्ये येतील. याशिवाय आता जाणून घ्या की कोणत्या महिन्यात तुम्हाला हॉलिडे कॉम्बो मिळू शकतात.
4 / 8
मार्चमध्ये वीकेंड कॉम्बो- 18 मार्च रोजी होळी आहे, ती सरकारच्या ऐच्छिक सुट्ट्यांच्या यादीत आहे. यावेळी होळीमध्ये आणखी दोन दिवस सुट्टी मिळणार आहे. होळी शुक्रवारी आहे आणि त्यानंतरचे दिवस शनिवार आणि रविवार आहेत. अशा परिस्थितीत घरापासून दूर राहणारे लोक कुटुंबासोबत होळी साजरी करू शकतात.
5 / 8
एप्रिलमध्ये मोठ्या सुट्या- एप्रिलमध्ये दोन केंद्रीय सुट्या आहेत. एक म्हणजे 14 एप्रिल आणि दुसऱ्या दिवशी 15 एप्रिलला गुड फ्रायडे. विशेष म्हणजे या दोन्ही सुट्ट्या गुरुवार आणि शुक्रवार आहेत. त्यानंतर शनिवार व रविवार आहे. तुम्हाला सलग चार दिवस सुट्टी मिळेल. या चार दिवसांच्या सुट्टीत तुम्ही सहलीचे नियोजनही करू शकता.
6 / 8
मे महिन्यात हॉलिडे कॉम्बो- मे महिन्यात दोन अधिकृत सुट्ट्या आहेत. एक ईद-उल-फित्र आणि दुसरी बुद्ध पौर्णिमा. तुम्हाला दोन्हीमध्ये हॉलिडे कॉम्बो मिळू शकतात. जर ईद 3 मे रोजी असेल तर तुम्ही 29 किंवा 30 एप्रिलला बाहेर फिरायला जाऊ शकता. 30 एप्रिल आणि 1 मे शनिवार आणि रविवार आहेत. त्यानंतर सोमवारी तुम्ही सुट्टी घेऊ शकता आणि 3 तारखेला तुम्हाला ईदची सुट्टी आहे. मे महिन्यात 16 मे रोजी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी असेल. हा दिवस सोमवार आहे. वीकेंड 14-15 रोजी असेल. अशा परिस्थितीत तुम्ही तीन दिवसांच्या सुट्टीचे नियोजन करू शकता.
7 / 8
ऑगस्ट मध्ये सुट्ट्या- मंगळवार 9 ऑगस्ट रोजी मोहरम आहे. शुक्रवार, 5 ऑगस्ट रोजी तुमचे काम पूर्ण करून तुम्ही सलग 4 दिवसांच्या सुट्ट्यांचे नियोजन करू शकता. सोमवार 8 एप्रिल रोजी तुम्हाला तुमच्या कॉलेज किंवा ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागेल. तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त 13 व 14 रोजी शनिवार व रविवार असणार आहे. अशा प्रकारे, आपण कुटुंब किंवा मित्रांसह तीन दिवसांच्या सुट्टीचे नियोजन करू शकता. रक्षाबंधनही याच महिन्यात आहे. गुरुवारी, 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. जर तुम्हाला ऑफिसमधून सुट्टी मिळत असेल तर तुम्ही या महिन्यात सतत सुट्टी घेऊ शकता. जसे, 6 आणि 7 ऑगस्ट (शनिवार-रविवार) ऑगस्ट 8 सुट्टी घ्या, 9 ऑगस्ट मोहरमची सुट्टी , 10 ऑगस्ट सुट्टी घ्या, बुधवार 11 ऑगस्टला रक्षाबंधनाची सुट्टी, 12 ऑगस्ट सुट्टी घ्या, 13 आणि 14 ऑगस्ट (शनिवार-रविवार) आणि 15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिनाची सुट्टी.
8 / 8
ऑक्टोबरमध्ये सुट्टीचे नियोजन करा- महिन्याची सुरुवात सुट्टीने झाली आहे. 1 ऑक्टोबरला शनिवार आणि 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी असेल. बुधवार 5 ऑक्टोबरपासून हॉलिडे कॉम्बो मिळू शकेल. हा दिवस दसरा आहे. त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवार अशा सलग दोन सुट्या आल्या आहेत. 9 ऑक्टोबरला ईद-ए-मिलाद आहे. दिवाळीसाठीही, तुम्हाला आधीच दोन दिवसांचा वीकेंड मिळत आहे. 22 आणि 23 ऑक्टोबरला शनिवार-रविवार, तर 24 ऑक्टोबरला दिवाळी आहे.
टॅग्स :New Yearनववर्षInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सDiwaliदिवाळी 2021Holiहोळी