By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 16:26 IST
1 / 7देशात कोरोना महामारीची दुसरी लाट अद्याप सुरु आहे. गेल्या एक आठवड्यापासून दर दिवसा सापडणारे रुग्ण हे 30 हजार पेक्षा कमी आहेत, हा दिलासा आहे. पुढे नवरात्री, दिवाळी सारखे सणवार आहेत. या काळात कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात असा इशारा एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. 2 / 7पुढील सहा ते आठ आठवडे खूप महत्वाचे आहेत. तोपर्यंत जर आधीसारखीच काळजी घेतली गेली, निष्काळजीपणा टाळला गेला तर कोरोनाचे रुग्ण खूप कमी सापडू लागतील. यामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, असेही ते म्हणाले.3 / 7गुलेरिया म्हणाले उत्सवी सीझनमध्ये आपल्याला सतर्क रहावे लागणार आहे. पुढील 6 ते 8 आठवडे आपण सतर्क राहिलो तर कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होऊ शकते, असे गुलेरिया म्हणाले.4 / 7एम्सच्या संचालकांचा इशारा यासाठी महत्वाचा आहे की, उत्सव काळात बाजारांमध्ये मोठी गर्दी होते जी व्हायरसचा प्रसार करण्यासाठी कारण ठरेल. पुढील काही महिन्यांमध्ये दसरा, दिवाळी, छट, ख्रिसमस सारखे उत्सव आहेत. 5 / 7अजित पवारांनी देखील कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे. एका सर्व्हेमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेले जवळपास 0.19 टक्के लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तर 0.25 टक्के लोक हे दोन डोस घेतलेले संक्रमित झाले आहेत. 6 / 7कोरोनाचे दोन डोस घेणारे लोक नियमांचे पालन करत नाहीएत असे काही तज्ज्ञांनी सांगितले आहे. जरी आम्ही बंधने हटवत असलो तरी तुम्ही कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे आहे, असा सल्लाही अजित पवारांनी दिला आहे. 7 / 7 एनसीपी नेते नवाब मलिक यांनी देखील येत्या सणासुदीच्या काळात लोकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. राज्य सरकारने नवरात्री, दसऱ्याबाबत निर्देश जारी केले आहेत. त्याचे योग्य पालन व्हावे अशी अपेक्षा आहे. जर लोकांनी नियमांचे पालन केले तर आपण कोरोनाला रोखण्य़ास यशस्वी होऊ.