शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nitin Gadkari: मिशन 2024! नितीन गडकरींची मोठी घोषणा; भारतात अमेरिकेसारखे गुळगुळीत रस्ते बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 3:37 PM

1 / 8
नवी दिल्ली: भारतातील रस्त्यांची अवस्था कशी आहे, हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. देशातील बहुतांश रस्ते अतिशय खराब परिस्थितीत आहेत. पण, आता भारतातही अमेरिकेप्रमाणे गुळगळूत रस्ते होणार आहेत.
2 / 8
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत माहिती देताना सांगितले की, 2024 च्या अखेरपर्यंत भारतातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीने विकसित करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
3 / 8
सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी हे प्रतिपादन केले. तसेच, रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले.
4 / 8
'रस्त्यांच्या सुविधा वाढवणे, ही एकमेव समस्या नाही. यासोबतच रोड इंजिनिअरींग, ऑटोमोबाईल इंजिनिअरींग यासोबतच लोकांमध्येही जागरुकता वाढवण्याची गरज आहे,'' असेही ते म्हणाले.
5 / 8
भारतातील अनेक लोक कुठल्याही चाचणीशिवाय सहजपणे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवतात. या मुद्द्याकडेही गडकरींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत, असे म्हणाले.
6 / 8
सभागृहात काँग्रेस खासदार एल. हनुमंतय्या यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची संख्या चिंतेचा विषय आहे. तसेच, राष्ट्रीय महामार्गांना जोडणारे रस्तेही केंद्रासाठी महत्वाचा मुद्दा असून, मंत्रालय योग्य पाऊल उचलत आहे.
7 / 8
'युद्धात जीव गेलेल्या लोकांचा आकडा जास्त आहे' असे म्हणत गडकरींनी भारतात दरवर्षी सुमारे दीड लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात अशी माहिती दिली.
8 / 8
रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी एका ठिकाणी एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास मंत्रालयाकडून ब्लॅक स्पॉट्स दाखवले जातात आणि आवश्यक ती पावले उचलली जातात, असेही ते म्हणाले.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूकAmericaअमेरिका