Nitin Gadkari says, government is working to develop electric highways powered by solar energy
Electric Highway: भारतात लवकरच तयार होणार 'इलेक्ट्रिक हायवे', नितीन गडकरींनी सांगितला मेगा प्लॅन... By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 8:47 PM1 / 7 Nitin Gadkari on Electric Highway: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी झपाट्याने वाढत आहे. इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. पण, तुलनेने देशात या गाड्यांना चार्ज करण्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन फार कमी आहेत. याला उपाय म्हणून आता लवकरच भारतात इलेक्ट्रिक हायवे(Electric Highways) होणार आहेत. भारतात सौर ऊर्जा आणि पवन उर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक हायवेवर काम सुरू असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सोमवारी एका कार्यक्रमात दिली. 2 / 7 पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स (IACC) या उद्योग संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, सरकार सौर ऊर्जेवर (Solar Energy) चालणाऱ्या इलेक्ट्रिक महामार्ग (Electric Highways) बनवण्याच्या दिशेने काम करत आहे.3 / 7 सरकारचे हे पाऊल उच्च मालवाहू क्षमता असलेल्या ट्रक आणि बसच्या चार्जिंगला सुलभ करण्याच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरेल. इलेक्ट्रिक हायवे (Electric Highways) असा रस्ता असतो, ज्यावर इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicle) चार्ज करण्याचे तंत्रज्ञान बसवलेले असते. यात ओव्हरहेड विद्युत लाइनद्वारेही विज देण्याचा पर्याय असतो.4 / 7 नितीन गडकरींनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन ऊर्जेवर आधारित चार्जिंग बनवण्याच्या दिशेने काम केले जाईल. ते पुढे म्हणाले की, या विकसित पायाभूत सुविधांमुळे आर्थिक विकासालाही चालना मिळेल. याद्वारे नवनवीन कंपन्या तयार होतील आणि परदेशी गुंतवणुकही वाढेल. देशात लवकरच 26 नवीन एक्सप्रेस-वे तयार होणार असल्याची माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली.5 / 7 राष्ट्रीय महामार्गालगत सुमारे 3 कोटी झाडे लावण्यात येणार असून सरकारकडून महामार्ग बांधणी व विस्तारीकरणादरम्यान वृक्षारोपण सुरू असल्याची माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये आतापर्यंत 27,000 झाडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी यशस्वीपणे हलवली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सरकार वृक्ष लागवडीसाठी नवीन धोरण तयार करत असून, त्याचे नाव ट्री बँक आहे, असेही ते म्हणाले.6 / 7 गडकरींनी पुढे सांगितले की, रस्ते मंत्रालय (Road Ministry) टोल प्लाझा (Toll Plaza)ला सौर ऊर्जेद्वारे चालवण्यावर भर देत आहे. नितीन गडकरींनी पुढे सांगितले की, पंतप्रधान गती शक्ती मास्टर प्लॅनची सुरुवात झाल्यासोबतच विविध योजनांना तात्काळ मंजुरी मिळेल आणि यातून लॉजिस्टिकवर लागणारा खर्चही कमी लागेल. यावेळी गडकरींनी अमेरिकेतील खासगी गुंतवणुकदारांना भारताच्या लॉजिस्टिक, रोपवे आणि केबल कार क्षेत्रांत गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले आहे.7 / 7 नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत एका लिखित उत्तरात गडकरी म्हणाले होते की, 19 मार्च 2022 पर्यंत एकूण 10,60,707 इलेक्ट्रिक गाड्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. तर, ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिएंसी (BEE) च्या आकडेवारीनुसार, 21 मार्च 2022 पर्यंत देशात 1,742 पब्लिक इलेक्ट्रिक व्हीकल चार्जिंग स्टेशन सुरू झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications