शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccination: ...तसा कोणताच अर्ज मिळालेला नाही; कोविशील्डसाठी युरोपचे दरवाजे बंदच?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 3:00 PM

1 / 9
देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. देशात सध्या दररोज ५० हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.
2 / 9
तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण अभियानाला गती देण्याची गरज आहे. लसीकरण अभियानात कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा सर्वाधिक वापर होत आहे. या दोन्ही लसी भारतातच तयार झाल्या आहेत.
3 / 9
कोविशील्ड लस सीरमनं तयार केली आहे. सीरमची उत्पादन क्षमता अतिशय जास्त असल्यानं देशातील बहुतांश जणांना कोविशील्ड लस मिळाली आहे. मात्र युरोपमध्ये सीरमच्या अडचणी वाढल्या आहेत.
4 / 9
सीरमनं अद्याप त्यांच्या लसीच्या वापरासाठी आमच्याकडे कोणताही परवानगी अर्ज केला नसल्याचं युरोपियन मेडिसिन्स एजन्सीनं (ईएमए) सांगितलं आहे. युरोपमध्ये औषधं वापरासाठीची परवानगी ईएमएकडून दिली जाते.
5 / 9
युरोपियन युनियनमध्ये कोविशील्ड लसीचा वापर करायचा असल्यास लस निर्मात्यांना ईएमएकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागतो, असं ईएमएनं पत्रकार परिषदेत सांगितलं.
6 / 9
आतापर्यंत ईएमएनं फायझर बायोटेकच्या कॉमिर्नटी, मॉडर्नाची स्पाईकवॅक्स, ऍस्ट्राझेनेकाची वॅक्सझेवरिया आणि जॉन्सन अँड जॉन्सनची जॅन्सेन या लसींना परवानगी दिली आहे. त्यामुळे युरोपियन युनियनमध्येया लसींचा वापर सुरू आहे.
7 / 9
ईएमएकडून कोविशील्डच्या लसीला महिन्याभरात परवानगी मिळेल, असा विश्वास सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी व्यक्त केला.
8 / 9
आम्ही ऍस्ट्राझेनेकाच्या मदतीनं कोविशील्ड लसीची निर्मिती केली. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्ही ईएमएकडे अर्ज करू. ईएमएची भूमिका योग्यच आहे, असं पुनावाला म्हणाले.
9 / 9
ईएमएनं परवानगी दिल्यास कोविशील्ड लसीचा वापर युरोपियन युनियनमध्ये सुरू होईल. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेका कंपनीनं कोरोना लसीवर संधोधन केलं. या लसीचं उत्पादन करण्याची जबाबदारी सीरमकडे आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या