शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Covaxin घेतल्यानंतर पॅरासिटामॉल, पेन किलर घेऊ नका; Bharat Biotech नं दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 9:54 AM

1 / 9
ओमायक्रॉनचा (Omicron Variant) वाढता संसर्ग लक्षात घेऊन देशभरात १५ ते १८ वर्षे वयाच्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस (Coronavirus Vaccine) देण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ४० लाखांहून अधिक मुलांना लस देण्यात आली होती.
2 / 9
१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना भारत बायोटेकने (Bharat Biotech) बनविलेली कोवॅक्सिन (Covaxin) ही लस देण्यात येत आहे. १२ वर्षे वयावरील मुलांना कोवॅक्सिन लस देण्यासाठी औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला २४ डिसेंबर रोजी सशर्त परवानगी दिली होती. देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे १० कोटी मुले आहेत.
3 / 9
लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकनं कोव्हॅक्सिन घेतल्यानंतर मुलांना पॅरासिटामॉल (paracetamol) किंवा कोणतंही पेन किलर (Pain killer) दिली जात नाही, असं भारत बायोटेकनं निवेदनाद्वारे म्हटलंय.
4 / 9
काही लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन सोबत पॅरासिटामॉल ५०० एमजी (paracetamol 500 mg) टॅबलेट घेण्यास सांगितलं जात असल्याचं निदर्शनास आल्याचंही त्यांनी म्हटलंय.
5 / 9
काही लसीकरण केंद्रांवर मुलांसाठी कोव्हॅक्सिनसोबत तीन पॅरासिटामॉल ५०० एमजी टॅबलेट घेण्याची शिफारस करत असल्याचा फिडबॅक आम्हाला मिळाला आहे. कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर पॅरासिटामॉल किंवा कोणतीही पेन किलर घेण्याची शिफारस केली जात नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
6 / 9
१५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहिमेची सुरूवात ३ जानेवारी रोजी करण्यात आलं आहे. या वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येत आहे.
7 / 9
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ३० हजार जणांवर लसीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यापैकी जवळपास १० ते २० टक्के लोकांमध्ये साईड इफेक्ट्स झाल्याचा रिपोर्ट आला असल्याचं त्यांनी नमूद केलं.
8 / 9
दरम्यान, अनेक साईड इफेक्ट्स हे सौम्य आहेत. एक किंवा दोन दिवसांत ते बरेही होतात. तसंच त्यांना औषधांचीही गरज नाही. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच लोकांना औषध घेण्याचा सल्ला दिला जातो, असंही त्यांनी म्हटलंय.
9 / 9
काही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांवर पॅरासिटामॉल घेण्याची शिफारस करण्यात आली होती. परंतु ते कोव्हॅक्सिन ही लस घेतलेल्यांसाठी नाही, असंही कंपनीनं म्हटलंय. भारतात सध्या तीन लसींचा वापर केला जात आहे. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या कोरोना प्रतिंबधात्मक लसींचा वापर लसीकरण मोहिमेत केला जात आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस