शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिलासा! आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 8:26 PM

1 / 10
मुंबई : यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (Unique Identification Authority of India)कोरोना संकट काळात महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
2 / 10
UIDAIम्हणण्यानुसार, ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांना लस, औषधे, रुग्णालयात किंवा उपचारास नकार देऊ शकत नाही. तसेच, आधार कार्डचा गैरवापर कोणतीही आवश्यक सेवा नाकारण्यासाठी करू नये, असे स्पष्टीकरण यूआयडीएआयने (UIDAI)दिले आहे.
3 / 10
काही लोकांकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना लसीकरण आणि इतर आत्यावश्याक कामांसाठी अडथळे येत असल्यामुळे UIDAI हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
4 / 10
कोरोना काळात प्रत्येकाला आवश्यक सुविधा मिळणे फार महत्वाचं आहे, कोणाकडेही आधार उपलब्ध नसेल तरी त्यांना सर्व सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
5 / 10
विशेष म्हणजे, जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरीही कोरोना लस, औषधे आणि रुग्णालयात दाखल सुद्धा होता येईल, असे UIDAIने सांगितले आहे.
6 / 10
आधारकार्ड नसल्यामुळे एखाद्याला आवश्यक वस्तू मिळत नसल्यास किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यास काही अडथळे येत असतील तर एजन्सी किंवा विभागास आधार अधिनियम, 2016 मध्ये नमूद केलेल्या विशिष्ट निकषानुसार त्याला सेवा द्यावी लागेल, असे देखील UIDAIने म्हटले आहे.
7 / 10
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आधार कार्ड नसल्यामुळे काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला जात होता. तसेच अनेकांना अत्यावश्यक सेवाही नाकारल्या जात होत्या, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. यानंतर UIDAIने हा निर्णय घेतला आहे.
8 / 10
आधारकार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे महत्त्वाचे ओळखपत्र आहे.
9 / 10
याचबरोबर, 24 ऑक्टोबर 2017 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात असेही जारी करण्यात आले होते, की आधारमुळे कोणाच्याही आवश्यक सेवांवर परिणाम होणार नाही.
10 / 10
त्यामुळे कोरोना काळात जरी आधार कार्ड काही कारणांसाठी नसेल, तरी सर्व अत्यावश्यक सेवांचा लाभ घेता येणार आहे.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल