Not just Nirav Modi, but these five were Ran away FROM COUNTRY
नीरव मोदीच नव्हे, तर हे पाच जण घोटाळा करून झाले पसार By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 2:59 PM1 / 5हिरे व्यापारी असलेले नीरव मोदी हे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा चुना लावला अन् तो देशातून परागंदा झाला. 2 / 5विजय माल्ल्या हा भारतातील एक मोठा उद्योगपती आहे. याचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्यानं 17 बँकांतून जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज घेतलं आणि कर्ज न फेडताच तो देशाबाहेर पळून गेला.3 / 5ललित मोदी हा आयपीएलचा चेअरमन आणि कमिश्नर होता. ललित मोदीला गैरवर्तणुकीसाठी बीसीसीआयनं निलंबितही केले होते. 2013ला त्याला दोषी ठरविण्यात आले होते. त्यानंतर तो देशातून पसार झाला. 4 / 5दाऊद इब्राहिम हा कुख्यात गुंड आहे. भारतात घातपाती कारवाया करून तो विदेशात पळून गेला. डी कंपनीचा म्होरक्या असलेल्या दाऊदविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. भारत त्याला अटक करण्यासाठी अद्यापही प्रयत्नशील आहे. 5 / 51997मध्ये गुलशन कुमारची हत्या झाली होती. या हल्ल्याचा तपास केला असता गुलशन यांच्या हत्येत नदीम अख्तरचा हात असल्याचं उघड झालं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications