शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Office: मनासारखी प्रगती होत नाही? ऑफिसमध्ये काम करताना करा हे उपाय, मिळेल झटपट यश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 4:52 PM

1 / 6
नेहमी लोक विचार करतात की, आपण ऑफिसमध्ये खूप कष्ट घेतो, मात्र वेळेवर प्रमोशन मिळत नाही आणि उत्पन्नही वाढत नाही. अशा परिस्थितीत ऑफिसमध्ये वास्तूदोष असू शकतो. आज ऑफिसबाबत काही वास्तू टिप्सबाबत सांगणार आहोत, ज्या माध्यातून कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. तसेच झटपट प्रगती होईल.
2 / 6
करिअरमध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल तर कार्यक्षमतेमध्ये वृद्धी करणे आवश्यक आहे. वास्तूशास्त्रानुसार काम करत असलेल्या टेबलावर बांबूची रोपं आणि क्रिस्टल ठेवल्याने कार्यक्षमतेमध्ये वाढ होते.
3 / 6
ऑफिसमध्ये काम करताना योग्य पद्धतीने बसणे खूप महत्त्वपूर्ण आहे. वास्तूशास्त्रानुसार कधी कधी काम करताना पायावर पाय ठेवून बसू नका. तसेच ऑफीसमध्ये काम करताना वापरल्या जाणाऱ्या खुर्चीचा मागचा भाग डोक्याच्या वर असलं पाहिजे.
4 / 6
कारकीर्दीमध्ये प्रगती होत नसेल तर झोपण्याची दिशा चुकीची असणे हेसुद्धा कारण ठरू शकते. वास्तूशास्त्रानुसार झोपताना डोकं नेहमी पूर्व दिशेमध्ये असलं पाहिजे. असे केल्याने मन शांत राहील. तसेच कामावर लक्ष कायम राहतं.
5 / 6
वास्तूशास्त्रानुसार वर्क फ्रॉम होम किंवा घरातून ऑफिसचं काम करत असाल तर त्यासाठी वेगळी जागा असली पाहिजे. त्यासाठी छोटासा डेस्क आणि एक आरामदायी खुर्ची ठेवा. मात्र हे टेबल आयताकार किंवा वर्गाकर असलं पाहिजे.
6 / 6
वास्तूशास्त्रानुसार इलेक्ट्रॉनिक उपकरणांना ठेवण्यासाठी दक्षिण-पूर्व दिशा लाभदायी आहे. अशा परिस्थितीमध्ये ऑफिसमध्ये काम करताना आपला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप या दिशेला ठेवला पाहिजे. तर लॅपटॉप आणि मोबाईलच्या चार्जरला अशा प्रकारे लावा की तो दिसणार नाही.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रjobनोकरीEmployeeकर्मचारी