जेव्हा पॅन्ट-शर्ट अन् बेल्टवर दिसला हत्ती; आनंद महिंद्रांनी नाव दिलं Ele-Pant, लोक म्हणतायत... By श्रीकृष्ण अंकुश | Published: March 03, 2021 6:02 PM
1 / 9 आपण शर्ट-पॅन्ट घातलेली माणसं पाहिली आहेत. पण कधी शर्ट-पॅन्ट घातलेला हत्ता (Elephant) पाहिला का? नक्कीच पाहिला नसेल. देशातील एक प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटरवर, अगदी माणसाप्रमाणेच शर्ट आणि पॅन्ट घातलेल्या एका हत्तीचा फोटो शेअर केला आहे. 2 / 9 आनंद महिंद्रा यांनी 3 मार्चला ट्विटरवर या हत्तीचा फोटो शेअर केला. आनंद महिंद्र यांनी याला 'अविश्वसनीय भारत,' असे कॅप्शन दिले आहे. 3 / 9 आनंद महिंद्रा यांनी हा फोटो सोशल मिडियावर शेअर करताच जबरदस्त व्हायरल झाला आहे. 4 / 9 या फोटोत दिसत आहे, की या हत्तीने काळ्या रंगाच्या बेल्टसह जांभळ्या रंगाचा शर्ट आणि एक पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. 5 / 9 या फोटोत हा हत्ता आपल्या माहुतासोबत फिरताना दिसत आहे. काही वेळातच महिंद्रा यांच्या या पोस्टला 14,000 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. 6 / 9 या फोटोवर अनेक जण कमेंट्सदेखील करत आहेत. एका युझरने म्हटले आहे, 'हे अत्यंत दु:खद आहे आणि गमतीशीरतर मुळीच नाही! आम्ही या सुंदर प्रतिष्ठित आणि अत्यंत बुद्धिमान प्राण्याला आपल्या मनोरंजनासाठी विदूषकासारखे केले आहे.' 7 / 9 एकाने कमेंट केली आहे, 'असे वाटते, की हत्तीने जिन्स परिधान केली आहे. बराच फॅशनेबल आहे.' 'एक यूझरने लिहिले आहे, हे सिद्ध झाले आहे, की भारत संपूर्ण जगाला कपडे घालू शकतो, हात्तालाही. 8 / 9 एका युझरने कमेंट करताना म्हटले आहे. 'एक वाक्प्रचार होता, अवघड कामासाठी हात्तीला चड्डी घालणे. मात्र, आपण भारतीय आहोत. आपण हत्तीला चड्डीच काय पॅन्ट शर्टदेखील घालतो.' 9 / 9 हत्तीचा हा फोटो देशातील कुठल्या राज्यातील आहे, हे कळू शकलेले नाही. मात्र, माहुदाचा पोशाख पाहून, हा दक्षीण भारतातील कुण्या एखाद्या शहरातील फोटो असावा, असा अंदाज लोक व्यक्त करत आहेत. आणखी वाचा