now corona will create havoc through water who shocking report
Corona Virus : चिंताजनक! हवा नाही तर आता पाण्यातही सापडला कोरोना; WHO ने दिला धोक्याचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 1:50 PM1 / 11कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात तज्ञांनी सांगितले होतं की, हा कधीही न संपणारा आजार आहे. कोरोना व्हायरस नेहमीच त्याचे स्वरूप बदलत राहील. तज्ज्ञांनी असंही म्हटलं होते की, तो काळाबरोबर थोडा कमकुवत होईल पण तो संपेल हे सांगणं कठीण आहे. 2 / 11तज्ज्ञांचे हे म्हणणं खरं ठरत आहे. आताही जगभरात कोरोना व्हायरसची प्रकरणं सातत्याने समोर येत आहेत. कोरोना व्हायरसमुळे गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांचाही मृत्यू होत आहे. आता WHO ने कोरोना व्हायरसबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.3 / 11गेल्या एका महिन्यात, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे 9 वेगवेगळे सीक्वेन्स सापडले आहेत. अलीकडेच WHO ने 17 ऑगस्ट रोजी कोरोनाच्य़ा BA.2.86 व्ह्रेरिएंटला निगराणीखाली ठेवलं होतं. युरोप, आफ्रिका आणि अमेरिका या भागांतून या व्हेरिएंटचे 9 वेगवेगळे सीक्वेन्स सापडले आहेत. 4 / 11या व्हेरिएंटमधून मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नसली तरी BA.2.86 कोरोना व्हेरिएंट थायलंड आणि स्वित्झर्लंडमध्ये पाण्यात सापडला आहेत. हा व्हेरिएंट देखरेखीखाली आहे. म्हणजेच अशा प्रकारच्या कोरोनामुळे फारशी हानी होत नाही, मात्र पाण्यात आढळल्यानंतर खबरदारी घेतली जात आहे. 5 / 11आशियाई देशांमध्ये थायलंडमधून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. गेल्या एका महिन्यात 1366 प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर एका महिन्यात भारतात 1335 आणि बांगलादेशातून 1188 नवीन रुग्ण आढळले आहेत. 6 / 11भारतात या आठवड्यात कोरोनासंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली आहे. ज्याचे अध्यक्षस्थान पंतप्रधान कार्यालयात होते आणि कोरोनाच्या व्हेरिएंटवर लक्ष ठेवण्याबाबत चर्चा होती. सध्या XBB.1.16 आणि EG.5 ही दोन रूपे जगात सर्वाधिक पसरलेली आहेत. 7 / 11XBB.1.16 एकूण 106 देशांमध्ये आढळतो आणि EG.5 एकूण 53 देशांमध्ये आढळतो. कोरोना व्हायरस आता महामारी राहिलेला नाही, पण कोरोना प्रकरणामुळे निर्माण झालेली चिंता अजूनही कायम आहे. यासोबतच कोरोनाचे काही प्रकार धोकादायक रूप धारण करून पुन्हा कहर होण्याची भीती आहे.8 / 11जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा नियमित अपडेट्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे आणि सर्व देशांना डेटा अपडेट करण्यास सांगितले आहे. गेल्या एका महिन्यापर्यंत जगातील फक्त 11% देश डेटा शेअर करत होते पण आता 44% देशांनी डेटा शेअर करायला सुरुवात केली आहे. 9 / 11234 देशांपैकी 103 देशांनी डेटा शेअर केला आहे. आणि गेल्या एका महिन्यात प्रत्येक देशातून सरासरी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. तथापि, डब्ल्यूएचओच्या मते, ही संख्या खूपच कमी आहे कारण अर्ध्या जगातून डेटा येत नाही.10 / 11उपलब्ध आकडेवारीनुसार, जगात कोरोनाचे पॉझिटिव्हिटी रेट आठ टक्के आहे. कोरिया, ऑस्ट्रेलिया, यूके आणि इटलीमध्ये कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. 234 देशांपैकी 27 देशांमधील कोरोनाचे 49,380 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. 11 / 1122 देशांमध्ये 646 लोक आयसीयूमध्ये दाखल आहेत. तथापि, केवळ 12% देशांनी गेल्या एका महिन्यात रूग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या नोंदवली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications