शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खुशखबर ! आता, कागदपत्रांशिवाय मिळवा आधार कार्ड, UIDAI कडून दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 1:28 PM

1 / 10
आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अत्यावश्यक असे कागदपत्र आहे. भारतीय नागरिक असल्याचा पुरावाच म्हणजे आधार ओळखपत्र होय.
2 / 10
कुठल्याही आर्थिक व्यवहारासाठी किंवा सरकारी कामकाजासाठी तुम्हाला आधार कार्ड वापरणे बंधनकारक आहे.
3 / 10
आधारकार्ड बनविण्याची प्रक्रिया आता आणखी सुलभ झाली आहे. भारतीय विशेष ओळख प्राधीकरण म्हणजेच UIDAI ने नागरिकांना दिलासा दिला आहे.
4 / 10
युआयडीएआयने आधार बनविण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्तीला पूर्णविरामा दिला आहे.
5 / 10
आधार कार्ड नसल्यामुळे अनेकदा आपली कामे अडकून पडतात. त्यामुळे अगोदर आधार कार्ड बनवून घ्यावे लागते. त्यासाटी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
6 / 10
ओळखपत्र आणि रहिवासी पत्ता संदर्भातील कागदपत्रे देणे बंधनकारक आहे, आता या कागदपत्रांशिवाय तुम्हाला आधार कार्ड बनवता येणार आहे.
7 / 10
आधार केंद्रावर उपस्थित असलेल्या इंट्रोड्युसरच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार ओळखपत्र बनवू शकता. इंट्रोड्युसर म्हणजे रजिस्टारने अधिकृतपणे नेमलेला व्यक्ती होय.
8 / 10
ज्यांच्याजवळ Pol किंवा PoA नाही, अशांची ओळख पटवून त्यांना आधार कार्ड देण्याचं काम इंट्रोड्युसरद्वारे करण्यात येईल. मात्र, त्यासाठी इंट्रोड्युसरकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.
9 / 10
अर्जदारासोबत इंट्रोड्युसरही आधार केंद्रावर उपस्थित असणेही बंधनकारक आहे, अर्जदाराची ओळख आणि पत्ता याची खात्री केल्यानंतर एनरॉलमेंट फॉर्मवर अर्जदाराची सही घ्यावी लागणार आहे.
10 / 10
UIDAI च्या परिपत्रकानुसार इंट्रोड्युसर अर्जदाराच्या नावाने एक प्रमाणपत्र जारी करेल, ज्याची वैधता ही तीन महिन्यांची असणार आहे.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड