शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी द्यावी लागणार नाही टेस्ट; सरकार आणतंय नवा नियम

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 06, 2021 1:03 PM

1 / 13
पूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) काढायचे म्हणजे, मेठे संकट उभे राहत होते. यासाठी आरटीओ ऑफीसच्या चकरा माराव्या लागत होत्या. अनेकदा अनेक जण दलालांचीही मदत घेत होते. याकडे सरकारने लक्ष देत ही प्रक्रिया ऑनलाईन केली. यामुळे जनतेचा त्रास कमी व्हायला मदत झाली. आता सरकार यात आणखी एक मोठा बदल करणार आहे.
2 / 13
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यासंदर्भात एक तरतूद करत आहे. यानुसार, वाहन चालवण्यासाठी आता कुणालाही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज पडणार नाही. (now no need of test for driving license)
3 / 13
या तरतुदीनुसार, ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरवरून ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर कुणालाही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही.
4 / 13
अर्थात ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरकडून आपण गाडी चालवायला शिकलात तर आपल्याला लायसन्ससाठी टेस्ट देण्याची गरज पडणार नाही.
5 / 13
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून या विशेष योजनेवर काम सुरू असून यासंदर्भात मंत्रालयाने अधिसूचनादेखील जारी केली आहे. तसेच यावर लोकांची मतेही मागवली आहेत.
6 / 13
या योजनेंतर्गत मंत्रालय टेस्टसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता देणार आहे. जेनेकरून ते त्याची अंमलबजावणी करतील. यासाठीही मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. मात्र, ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सना सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
7 / 13
लोकांच्या सूचनांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आधिसूचनेचा ड्राफ्ट आपल्या वेबसाइटवरही टाकला आहे. यात आपणही आपल्या सूचना देऊ शकता.
8 / 13
ड्रायव्हिंग लायसन्सचं महत्व - ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवणे बे कायदेशीर आहे. एवढेच नाही, तर ड्रायव्हिंग लायसन्सला ओळखपत्र म्हणूनही मान्यता आहे. याच बरोबर, हे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर आपल्याला इतर देशांतही गाडी चालवता येते.
9 / 13
घर बसल्या रिन्यू करा आपले ड्रायव्हिंग लायसन्स - कोरोना महामारीच्या काळात आपल्याला वाहन परवाना अथवा ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायचे असेल आणि आपली आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची इच्छा नसेल तर आपण घरबसल्याच आपले ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करू शकता.
10 / 13
वाहन परवाना रिन्यू करण्यासाठी आधी आरटीओच्या ऑफिसमध्ये जावे लागत होते. पण आता तुम्ही घर बसल्याही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करू शकता.
11 / 13
यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक फॉर्म डाऊनलोड करून तो भरावा लागेल आणि नंतर स्कॅन करून अपलोड कारावा लागेल. याशिवाय आपले वय 40 वर्षांपेक्षा अधिक असेल तर आपल्याला एखाद्या मान्यताप्राप्त डॉक्टरांनी भरलेला फॉर्म 1 ए आवश्यक असेल.
12 / 13
याच बरोबर आपल्याला एक्सपायर्ड ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आधार कार्डचा फोटोही अपलोड करावा लागणार आहे.
13 / 13
ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना रिन्यू करण्यासाठी आपल्याला भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला https://parivahan.gov.in/parivahan/ भेट द्यावी लागेल.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRto officeआरटीओ ऑफीसCentral Governmentकेंद्र सरकार