शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

52 दिवसांपासून ड्युटीवरच नर्स; अचानक मुलीचा व्हिडीओ कॉल आला अन् अश्रूंचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 8:50 AM

1 / 12
जगभरातील कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या आणि त्यांची काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांना बर्‍याच भावनिक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
2 / 12
हे कोरोना वॉरियर्स आपले कुटुंब आणि मुलांना मागे ठेवून दिवसरात्र कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. प्रत्येक आघाडीवर कोरोना विषाणूसारख्या भयंकर आजाराशी लढत आहेत. समाजासाठी ते एक प्रकारचे देवदूतच आहेत.
3 / 12
विशेष म्हणजे अशा डॉक्टर आणि नर्सेस कित्येक दिवस घरीच परतलेले नाहीत. रुग्णांची सेवा करण्यालाच ते प्रथम प्राधान्य देत आहेत.
4 / 12
अशीच एक भावनिक कथा मध्य प्रदेश मंडौसर येथे घडली आहे. शांता पंवार ही परिचारिका गेल्या ५२ दिवसांपासून घरी जाऊ शकलेली नाही.
5 / 12
ती गेल्या 52 दिवसांपासून आपल्या कुटुंबीयांना भेटू शकलेली नाही. ती तिच्या तीन वर्षांच्या मुलीशी व्हिडीओ कॉलवर बोलली अन् तिच्या अश्रूंचा बांधच फुटला, ती मुलीशी बोलताना हुंदके देऊन रडू लागली.
6 / 12
ती रुग्णालयात राहूनच रुग्णांची सेवा करत आहे. कोरोना विषाणूचा संशय असलेल्या रुग्णांची देखभाल करणं आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना सेवा देण्याची शांता पंवारवर जबाबदारी देण्यात आली आहे.
7 / 12
नर्स शांता पंवार रुग्णांच्या काळजीसाठी दररोज 12 ते 14 तास कर्तव्य बजावत आहे. शांता पंवार सांगते की, ती गेले 52 दिवस दररोज इथे काम करत आहे. त्यांना एक तीन वर्षाची मुलगी आहे.
8 / 12
ती नेहमी घरी येण्यास सांगते. मलासुद्धा तिची रोज आठवण येते. अशा परिस्थितीत भेटणे फार कठीण असून, म्हणूनच आम्ही व्हिडीओ कॉलवर बोलतो.
9 / 12
तसेच माझी सासू माझ्या मुलीची खूप काळजी घेते आणि तिला धीर देते. कारण यावेळी हॉस्पिटलला माझी सर्वात जास्त गरज आहे.
10 / 12
व्हिडीओ कॉलवर बोलताना माझी मुलगी मला खूप धीर देते. मम्मा घाबरू नकोस, मी स्वतः तुला घ्यायला येईन. मोदीजी जेव्हा लॉकडाऊन उघडतील तेव्हा मी वडिलांसोबत तुला घ्यायला येईन.
11 / 12
माझी मुलगी नेहमी मला रडू नकोस असे सांगते. मुलगी मला खूप मिस करते, असं नेहमीच सासू सांगत असते. मुलीशी बोलत असताना शांता पंवार यांचे अश्रू अनावर झाले.
12 / 12
मंदसौर जिल्ह्यातील पिपलिया मंडी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आसिफ खान सांगतात, 'आमच्या इथे शांता पवार ही एक नर्स आहे, ती गेल्या 52 दिवसांपासून तिच्या घरी गेली नाही, ती येथील विलगीकरण केंद्रामध्ये रुग्णांना सेवा देत आहे.' आम्हाला त्यांचा अभिमान आहे, ही आपत्ती लवकरात लवकर संपेल आणि त्यांना घरी जाऊन त्यांच्या 3 वर्षांच्या मुलीला भेटता येईल, अशी आम्ही आशा करतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या