सैन्य दिनानिमित्त अहमदनगरमधल्या के के रेंजमध्ये आर्मीचा युद्धसराव By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 1:40 PM
1 / 5 सैन्य दिनानिमित्त आज अहमदनगरमधल्या के के रेंजमध्ये आर्मीचा युद्धसराव झाला. 2 / 5 यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या रणगाड्यामधून शत्रूचं लक्ष्य अचूक टिपण्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. अर्जुन, भीष्म आणि अजय या रणगाड्यांनी या कवायतीत सहभाग घेतला. 3 / 5 भारतीय सेनेकडून दरवर्षी 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन साजरा करण्यात येतो. 4 / 5 15 जानेवारी 1949 रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्र हाती घेतली होती. 5 / 5 या ऐतिहासिक क्षणानिमित्त 15 जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो. सैन्य दिनानिमित्त दिल्लीत आर्मी डे परेडचे आयोजन केले जाते. आणखी वाचा