शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऐतिहासिक विजयानंतर भाजपाकडून ओदिशामघ्ये सरकार स्थापनेची तयारी, मुख्यमंत्रिपदासाठी ही तीन नावं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 9:49 AM

1 / 7
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्यात अपयश आल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मात्र लोकसभेबरोबर झालेल्या ओदिशा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमताहस ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
2 / 7
या विजयासह भाजपाने ओदिशामधील नवीन पटनाईक यांनी २४ वर्षांपासूनची राजवट संपुष्टात आणली आहे. १४७ सदस्य असलेल्या ओदिशा विधानसभेत ७८ जागा जिंकत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर नवीन पटनाईक यांच्या बीजू जनता दल पक्षाला ५१, काँग्रेसला १४, सीपीआयएमला १ आणि इतरांवा ३ जागा मिळाल्या आहे.
3 / 7
दरम्यान, निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बहुमत मिळवणाऱ्या भाजपाकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तसेच भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच भाजपामधून भावी मुख्यमंत्री म्हणून काही नावंही समोर येत आहेत. ही नावं पुढीलप्रमाणे.
4 / 7
केंद्रीय शिक्षणमंत्री आणि संबलपूरचे खासदार धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्रिपदासाठी होत आहे. भाजपाच्या ओडिया अस्मिता अभियानाचं नेतृत्व धर्मेंद्र प्रधान यांनी केलं. १० वर्षे केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद सांभाळणारे धर्मेंद्र प्रधान हे इतर नेत्यांच्या तुलनेत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी २००० मध्ये आमदारकीपासून कारकिर्दीची सुरुवात केली होती. पुढे २००४ मध्ये ते देवगड लोकसभा मतदारसंघातून निवडून आळे होते. मात्र २००९ मध्ये पल्लाहारा विधानसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. पुढे ते राज्यसभेवर निवडून गेले होते.
5 / 7
भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा हे सुद्धा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधील प्रमुख उमेदवार आहेत. बीजू जनता दलाकडून एकदा राज्यसभा आणि दोनवेळा लोकसभेचे सदस्य राहिलेल्या बैजयंत पांडा यांनी सहा वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. २०१९ मध्ये ते केंद्रपाडा लोकसभा मतदारसंघाडून पराभूत झाले. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीजेडीच्या अंशुमन मोहंती यांचा पराभव करत विजय मिळवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असलेल्या काही नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधील आघाडीचा उमेदवार मानलं जात आहे.
6 / 7
भाजपा नेत्या अपराजिता सारंगी यांनी भुवनेश्वर मतदारसंघात काँग्रेस नेता यासिर नवाज आणि बीजेडीच्या मनमथ राऊथे यांना पराभवाचा धक्का देत विजय मिळवला आहे. अपराजिता या सरकारी कर्मचारी राहिलेल्या आहेत. तसेच त्यांचे पतीही सरकारी सेवेमध्ये आहेत. याशिवाय त्या सामाजिक कार्यामध्येही सक्रिय असतात.
7 / 7
भाजपाचे बालासोर लोकसभा मतदारसंघातील खासदार प्रताप सारंगी हेसुद्धा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधील प्रमुख नाव आहे. ते २०२२ मध्ये जलसंसाधन संबंधीच्या समितीचे सदस्य होते. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.
टॅग्स :BJPभाजपाOdishaओदिशाChief Ministerमुख्यमंत्री