शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोनाची RT-PCR टेस्ट फक्त 400 रुपयांत; "या" सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 5:02 PM

1 / 12
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 94,99,414 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,38,122 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 12
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 36,604 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 501 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
3 / 12
देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही वाढत आहे.
4 / 12
मास्क, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. तसेच कोरोना चाचणीचे प्रमाण हे वाढवण्यात आले आहे.
5 / 12
कोरोना चाचणीच्या दरात अनेक राज्यांमध्ये कपात करण्यात येत आहे. याच दरम्यान ओडिशामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. RT-PCR test फक्त 400 रुपयांमध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
6 / 12
कोरोनाच्या RT-PCR चाचणीसाठी आतापर्यंत 2000 ते 2400 रुपये मोजावे लागत होते. काही दिवसांपूर्वी दिल्ली सरकारने मात्र खासगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचा दर 800 रुपये केला आहे.
7 / 12
दिल्लीनंतर आता राजस्थान आणि गुजरात सरकारनेही खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. मंगळवारी उत्तर प्रदेश सरकारने आरटी-पीसीआर चाचणीच्या दरात कपात करून 700 रुपये केली आहे.
8 / 12
ओडिशा सरकारने या सर्व राज्यांना मागे सोडत आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त कोरोना चाचणीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीसाठी फक्त 400 रुपये मोजावे लागतील.
9 / 12
ओडिशा सरकारने राज्यातील सर्व खासगी लॅबधारकांना देखील याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. यामध्ये आरटी-पीसीआर चाचणीसाठी रुग्णांकडून 400 रुपयांपेक्षा अधिक पैसे घेता येणार नाहीत हे नमूद केलं आहे.
10 / 12
दिल्ली सरकारने आरटी-पीसीआर चाचणीचा दर 2400 रुपयांवरून घटवून 800 रुपये केला आहे. दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे.
11 / 12
गुजरातमध्ये ही कोरोना चाचणीच्या दरात घट पाहायला मिळाली आहे. आरटी-पीसीआर चाचणीसाठी लोकांना आता 800 रुपये मोजावे लागणार आहेत.
12 / 12
दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेश सरकारनंतर आता ओडिशातही आरटी-पीसीआर चाचणीसाठी कमी पैसे द्यावे लागणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOdishaओदिशाdelhiदिल्लीGujaratगुजरातUttar Pradeshउत्तर प्रदेश