शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Omicron Variant : धोका वाढला! ओमायक्रॉनची एन्ट्री होताच 'या' गावाने घेतला मोठा निर्णय; 10 दिवसांचा लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 2:24 PM

1 / 12
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,650 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 374 जणांचा मृत्यू झाला आहे.
2 / 12
कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,79,133 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. देशात गुरुवारी ओमायक्रॉनचे 64 नवे रुग्ण सापडले.
3 / 12
तामिळनाडूमध्ये 33, तेलंगणात 14, कर्नाटकात 12, केरळमध्ये 5 नवे रुग्ण आढळल्याने या विषाणूच्या रुग्णांची एकूण संख्या 325 वर पोहोचली. ओमायक्रॉन 16 राज्ये, केंद्रशासित राज्यांमध्ये पसरला आहे. महाराष्ट्रात नवे 23 रूग्ण आढळल्याने ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 88 इतका आहे.
4 / 12
तामिळनाडूमध्ये ओमायक्रॉनचे बरेच रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नव्या विषाणूच्या 57 संशयास्पद रुग्णांपैकी 34 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले, तर बाकीच्यांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत.
5 / 12
दोन अल्पवयीन मुले वगळता सर्वांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मोठ्या संख्येने रुग्ण आढळले, तरी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तमिळनाडू सरकारने केले आहे. याच दरम्यान तेलंगणाने देखील ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
6 / 12
आखाती देशातून गावात आलेली एक व्यक्ती ओमायक्रॉन बाधित आढळल्यानंतर लगेचच संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी सर्व सहमतीने गावात दहा दिवस लॉकडाऊन लावण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
7 / 12
तेलंगणमधील रंजना सिरसिला जिल्ह्यातील गुडेम या गावाने प्रशासनाच्या कोणत्याही आदेशाची वाट न पाहता गावात लॉकडाऊन लावून टाकले आहे. आखाती देशातून एक व्यक्ती गावात परतली होती. तो करोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते.
8 / 12
रिपोर्ट आल्यानंतर त्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तातडीने त्याला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. गावाने खबरदारी म्हणून थेट लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला.
9 / 12
गावात ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळल्यानंतर तातडीने ग्रामपंचायतीची बैठक झाली. त्यात एकमताने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. गावात आवश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व व्यवहार पुढील दहा दिवस बंद राहणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 12
भारतात लसीकरण झालेल्या लोकांपैकी तब्बव 90% लोकांना देखील ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.
11 / 12
ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लसीच्या क्षमतेवर ब्रिटनमध्ये हा अभ्यास करण्यात आला आहे आणि त्यानुसार, केवळ फायझर आणि मॉडर्ना लस कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास सक्षम आहेत. पण यासाठी या लसींचा बूस्टर डोस द्यावा लागेल.
12 / 12
जगातील बहुतांश देशांमध्ये या दोन्ही लसी उपलब्ध नाहीत. भारताच्या संदर्भात अभ्यासाविषयी बोलताना असं म्हटलं आहे की, ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेका लसीने सहा महिन्यांच्या लसीकरणानंतर ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्याची कोणतीही क्षमता दर्शविली नाही.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTelanganaतेलंगणा