शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: कोरोनाबाबत ICMR च्या वैज्ञानिकाचा मोठा दावा; “११ मार्चपर्यंत वाट पाहा, त्यानंतर...”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 5:06 PM

1 / 10
गेल्या २ वर्षापासून जगात कोरोना महामारीनं सर्वच देशांची चिंता वाढवली आहे. चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनानं लाखो लोकांचा जीव घेतला. अमेरिकेसारख्या प्रगतशील देशालाही कोरोनाचा फटका बसला. कोट्यवधी लोकं कोरोनाच्या विळख्यात अडकले.
2 / 10
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनसारखा पर्याय पुढे आला. आता कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटमुळे लोकांच्या मनावर या व्हायरसची दहशत कायम आहे. त्यात दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं नियंत्रणात आलेली रुग्णसंख्या झपाट्याने वाढली.
3 / 10
कोरोना महामारी(Corona Pandemic) ११ मार्चनंतर एक स्थानिक आजार बनेल असा दावा इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डॉक्टर समिरन पांडा यांनी केला आहे. जर ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटचं संक्रमण कायम राहिले तर तो डेल्टाही मागे टाकू शकतो असं त्यांनी सांगितले आहे.
4 / 10
जर भविष्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आला नाही तर कोविड १९ हा स्थानिक आजार बनू शकतो असं ICMR च्या डॉक्टरांनी सांगितले आहे. एनडेमिक आजार म्हणजे लोकसंख्येमध्ये कोणताही रोग कायमस्वरूपी प्रसारित होऊ शकत नाही आणि कोविड-१९ महामारी ज्या प्रकारे विकसित होत आहे, त्यावरून हा विषाणू पूर्णपणे नष्ट होणार नाही.
5 / 10
जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील अनेक सर्वोच्च शास्त्रज्ञांनी याची शक्यता व्यक्त केली आहे. इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, डॉ समिरन पांडा यांनी सांगितले की, देशात कोरोनाची तिसरी लाट ११ डिसेंबरपासून ओमायक्रॉनमुळे सुरू झाली.
6 / 10
मात्र, ११ मार्चपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र त्यासाठी आणखी दोन आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे. जर दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोनाची प्रकरणे शिगेला पोहोचली असतील आणि सर्वात वाईट परिस्थिती संपली असेल.
7 / 10
परंतु या दोन शहरांमध्ये कोरोना रुग्ण आणि पॉझिटिव्ह रेट कमी होऊ लागले असले तरी याबाबत सध्या काही सांगू शकत नाही. डॉ सिमरन पांडा यांनी सांगितले की, दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन आणि डेल्टा संसर्गाची प्रकरणे ८०:२० च्या प्रमाणात आहेत.
8 / 10
देशातील विविध राज्ये महामारीचे वेगवेगळे टप्पे पाहायला मिळत आहेत. आणि ICMR महामारीशी संबंधित परिस्थिती लक्षात घेऊन टेस्टिंग धोरण तयार करत आहे. ICMR नं कोरोना टेस्टिंग कमी करण्यास सांगितले नाही. टेस्टिंगबाबत चांगले पर्याय दिले आहेत.
9 / 10
दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यात जर तुम्ही लस घेतली असेल तर शरीरात इम्युनिटी कधीपर्यंत राहील? त्यावर भारतात नवा रिसर्च समोर आला आहे. १० पैकी ३ लोकांमध्ये व्हॅक्सिनमुळे बनलेली इम्युनिटी ६ महिन्यानंतर संपुष्टात येत असल्याचं आढळलं आहे.
10 / 10
हैदराबाद येथील AIG हॉस्पिटल डॉक्टरांच्या पथकाने १६३६ लोकांवर स्टडी केली. या लोकांना लसीचे दोन्ही डोस दिले होते. यातील जवळपास ३० टक्के लोकांमध्ये ६ महिन्यानंतर इम्युनिटी स्तर १०० AU/ml च्या खाली जात असल्याचं दिसून आलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन