Omicron: Strict restrictions will be imposed in 23 districts for 2 weeks; Central government alert
Omicron: ‘या’ जिल्ह्यांमध्ये २ आठवडे कठोर निर्बंध लागणार; ओमायक्रॉनमुळे केंद्र सरकार अलर्ट By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 11:17 AM1 / 10दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने संक्रमित करत आहे. यूकेत तर याची भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. याठिकाणी दिवसाला ८० हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. 2 / 10भारतातही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा(Omicron Variant) शिरकाव झाला आहे. देशातील ११ राज्यांमध्ये जवळपास १११ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन वेगाने पसरत असून अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.3 / 10भारतात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात ४०, राजस्थान १७, दिल्ली २२, गुजरात ५, केरळ ७, कर्नाटक ८, तेलंगाना ८, आंध्र प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू याठिकाणी प्रत्येकी १ असे एकूण १११ रुग्ण देशात आहेत.4 / 10जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने केंद्र सरकारने सांगितले आहे की, कम्युनिटी स्तरावर पसरण्यामागे ओमायक्रॉन डेल्टा व्हेरिएंटलाही मागे टाकेल. हा नवा व्हेरिएंट प्रचंड वेगाने लोकांना संक्रमित करत आहे. मागील २० दिवसांत देशात दर दिवशी १० हजारापेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत.5 / 10परंतु दुसऱ्या देशात ओमायक्रॉनमुळे झालेली परिस्थिती पाहता भारताला सतर्क राहणं गरजेचे आहे. देशातील २३ जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या जिल्ह्यात २ आठवडे कठोर निर्बंध लावण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत संक्रमण दर कमी होत नाही तोवर निर्बंध सुरु ठेवावेत असे केंद्राने म्हटलं आहे.6 / 10महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे मुंबईत १४, पिंपरी चिंचवड १०, पुणे ८, कल्याण-डोंबिवली, उस्मानाबाद २, तर लातूर, बुलढाणा, नागपूर आणि वसई १ असे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील या भागातही विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.7 / 10कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन आतापर्यंत ९१ देशांत पसरला आहे. G7 देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी यामुळे चिंता व्यक्त केली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट जगासाठी नवा धोका असल्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे. या संकटाशी सर्व देशांनी एकत्र येत सामना करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.8 / 10ब्रिटनमध्ये दिवसाला ८० हजाराहून अधिक कोरोना संक्रमित आढळत आहेत. अनेक यूरोपियन देशांनी प्रवासावर बंदी आणली आहे. ओमायक्रॉनमुळे अमेरिकेतही परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी जनतेला इशारा दिला आहे.9 / 10बायडन म्हणाले की, ज्या लोकांनी लस घेतली नाही अशांना यंदाच्या थंडीत सर्दी आणि मृत्यू दोघांचा सामना करावा लागू शकतो. ओमायक्रॉनमुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. मृत्यूचा धोका वाढू शकतो. मागील ४ दिवसांपासून अमेरिकेत १ लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.10 / 10दरम्यान, निष्काळजीपणा घातक ठरु शकतो. ब्रिटनमध्ये ज्यारितीने कोरोना हातपाय पसरत आहे ते पाहता तसाच रुग्णसंख्येचा उद्रेक भारतात झाला तर देशात दिवसाला १४ लाख रुग्ण सापडतील असा धोका नीती आयोगाचे डॉ. व्ही. के पॉल यांनी दिला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications