Omicron Variant Covishield Covaxin may be ineffective says Covid Task Force Dr VK Paul
Omicron Variant Corona Vaccines : कोरोनावरील स्वदेशी लसी ओमायक्रॉनवर निष्प्रभ?; डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली भीती By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 6:34 AM1 / 10ओमायक्रॉन या नव्या विषाणूमुळे नजीकच्या काळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे सध्या वापरात असलेल्या लसी निष्प्रभ होण्याची शक्यता आहे, असे कोरोनासंदर्भातील केंद्रीय कृती गटाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. ओमायक्रॉनवर मात करू शकतील, अशा नव्या लसी बनविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.2 / 10ते म्हणाले की, भारतामध्ये कोरोनाचा प्रसार मध्यम किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात होत आहे. याआधी डेल्टा विषाणूने केलेला कहर आपण बघितला आहे. आता ओमायक्रॉनचा धक्का सहन करावा लागत आहे. नवीन विषाणूचे गेल्या तीन आठवड्यात निरीक्षण करण्यात आले. 3 / 10ओमायक्राॅनमुळे देशातील कोरोना लसी निष्प्रभ ठरण्याची शक्यता आहे. ओमायक्राॅनच्या परिणामांबाबतचे ठोस चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोरोना विषाणू जसे रूप पालटेल, त्याप्रमाणे नव्या लसी त्वरित तयार करण्याची यंत्रणा असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.4 / 10ओमायक्राॅनच्या रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी त्या विषाणूचा प्रचंड वेगाने प्रसार होत असल्याचे असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी म्हटले आहे. या विषाणूचे अस्तित्व ७७ देशांमध्ये आढळले आहे.5 / 10राज्यात आणखी चार ओमायक्रॉनबाधित आढळले. यापैकी दोन रुग्ण उस्मानाबाद तर मुंबई आणि बुलडाणा येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनचे ३२ रुग्ण सापडले आहेत.6 / 10ओमायक्राॅनच्या प्रसारात जानेवारी, फेब्रुवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, संसर्ग सौम्य स्वरुपाचा असेल. त्यामुळे रुग्णांची प्रकृती गंभीर होण्याचा धोका कमी आहे, त्यामुळे घाबरु नये, असे केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 7 / 10जगभरात दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. आतापर्यंत ४० हून अधिक देशात ओमायक्रॉन व्हेरिएंट पसरला असून डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने पसरत असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितले आहे.8 / 10देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या अद्याप दोन आकड्यांत असली तरी त्यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल राजस्थान, दिल्ली व गुजरात या तीन राज्यांचा क्रमांक लागतो. देशात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने या तीन राज्यांत चिंता व भीती वाढली आहे.9 / 10दुबईहून सोमवारी महाराष्ट्रात आलेले दोघे ओमायक्रॉनचे रुग्ण निघाले आहेत. देशात ओमायक्रॉनचे एकूण ४९ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २० एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यातही मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड भागातच अधिकांश रुग्ण आढले आहेत.10 / 10दिल्ली व राजस्थानमध्ये गेल्या २४ तासांत ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत राजस्थानमध्ये ९ तर दिल्लीत ६ रुग्ण आढळले असून, गुजरातमध्ये ही संख्या ४ आहे. कर्नाटकात तीन तसेच केरळ, आंध्र प्रदेश तसेच चंदीगडमध्ये प्रत्येकी एक रुग्णावर उपचार सुरू आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications