शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Omicron चा धोका! जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येणार; दिवसाला दीड लाख संक्रमित?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 11:14 AM

1 / 10
मागील वर्षभरापासून जगावर कोरोना महामारीचं संकट आले आहे. कडक लॉकडाऊनमधून हळूहळू लोकं बाहेर पडू लागले. कोरोना लसीकरणानं या आजाराला नियंत्रणात आणलं. पुन्हा एकदा सर्व देशातील जनजीवन पुर्वपदावर येत होते. मात्र कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटमुळे अनेक देशांची चिंता वाढवली आहे.
2 / 10
सर्वकाही सुरळीत होत असताना दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं सर्व देशांना सतर्क केले आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने संक्रमित होत असून दक्षिण आफ्रिकेतील वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीने लोकांमध्ये दहशत पसरली आहे.
3 / 10
देशात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयआयटी कानपूर येथील प्रोफेसर मणीद्र अग्रवाल यांनी दावा केला आहे की, देशात जानेवारी २०२२ पासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात होऊ शकते.
4 / 10
अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिका आणि दुसऱ्या देशाच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर हा दावा केला आहे. ते म्हणाले की, ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा दुप्पट वेगाने पसरत आहे. त्यासाठी निर्बंध लागू करुन त्याचा प्रसार कमी केला जाऊ शकतो. WHO नंही ओमायक्रॉन व्हेरिएंट चिंताजनक श्रेणीत टाकला आहे.
5 / 10
दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत प्रोफेसर अग्रवाल म्हणाले की, जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पीक वर जाईल. त्यावेळी संक्रमण दिवसाला दीड लाखापर्यंत जाऊ शकतं. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंट काही महिन्यांपूर्वीच आला होता. तो आता हळूहळू पसरत आहे.
6 / 10
त्यामागे कारण होतं की, द. आफ्रिकेत ८० टक्क्यापेक्षा जास्त लोकांमध्ये कोविडविरुद्ध नॅच्युरल इम्युनिटी तयार झाली होती. म्हणजे याठिकाणी लोकांना आधीच कोरोना झाला होता. त्यातून ते बरे झाले होते. असंही प्रोफेसर मणींद्र अग्रवाल यांनी सांगितले.
7 / 10
कोविडच्या दुसऱ्या लाटेत भारतात असे अनेक रुग्ण समोर आले होते ज्यांना कोरोनानं पुन्हा संक्रमित केले होते. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा संक्रमित होण्याच्या धोक्याबाबत ते म्हणाले की, आतापर्यंत १ स्टडी आली आहे. ज्यानुसार, मागील ३ महिन्यात पुन्हा संक्रमित झालेल्यांची संख्या ३ पटीनं वाढली आहे.
8 / 10
परंतु ही कमी आकडेवारी आहे. दक्षिण आफ्रिकेत संक्रमित होणाऱ्यांमध्ये १ टक्के लोक पुन्हा संक्रमित झालेत. आमच्या स्टडीनुसार ओमायक्रॉन नॅच्युरल इम्युनिटीला बाइपास करत आहे परंतु त्याचा अधिक परिणाम झालेला दिसत नाही.
9 / 10
भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंट रोखण्यासाठी काय करावं लागेल यावर ते म्हणाले की, देशात कडक लॉकडाऊनऐवजी सावध राहणं गरजेचे आहे. जास्त गर्दी होणाऱ्या परिसराला लॉकडाऊन करा. सरकारने निर्बंध आणायला हवेत आणि लॉकडाऊन टाळायला हवा.
10 / 10
अतिशय वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनचा आतापर्यंत ३८ देशांमध्ये शिरकाव झाला आहे. आतापर्यंत ४०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ ब्रिटन, घाना आणि नेदरलॅंड या देशांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेतही सहा राज्यांमध्ये नवा विषाणू पाय पसरत आहे. भारतातही याचे रुग्ण आढळत आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन