On August 15, these five countries along with India also celebrate 'Independence Day'!
१५ ऑगस्टला भारतासह 'हे' पाच देश सुद्धा 'स्वातंत्र्यदिन' करतात साजरा! By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 10:17 AM1 / 6भारतात आज स्वांतत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तसेच, सरकारच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेमुळे या सर्वात मोठ्या राष्ट्रीय सणाच्या भव्यतेत भर पडली आहे. दरम्यान, भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला. यावर्षी स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. 2 / 6जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेल्या लिकटेंस्टीनला १८६६ मध्ये जर्मन राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य मिळाले. मात्र १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय दिन १९४० पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी संपूर्ण देशात सुट्टी असते. ५ ऑगस्ट १९४० रोजी, लिकटेंस्टीनच्या प्रिन्सिपॅलिटीच्या सरकारने अधिकृतपणे १५ ऑगस्ट हा देशाचा राष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला.3 / 6बहरीन १५ ऑगस्ट १९७१ रोजी स्वतंत्र झाले. बहारीनवर ब्रिटनचा ताबा होता. या दिवशी बहरीनचा शासक इसा बिन सलमान अल खलिफा याची बहरीनच्या प्रमुख पदाची निवड झाली.4 / 6डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोने १५ ऑगस्ट १९६० रोजी फ्रेंच राज्यकर्त्यांपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवले. हा देश मध्य आफ्रिकन प्रदेशात येतो. हे १८८० मध्ये फ्रेंच राज्यकर्त्यांनी गुलाम बनवले होते. प्रथम हा देश फ्रेंच कांगो म्हणून ओळखला जात होता. नंतर १९०३ मध्ये मध्य कांगो म्हणून ओळखला जात होता. स्वातंत्र्यानंतर, फुलबर्ट यूलू हे देशाचे पहिले राष्ट्रपती झाले आणि त्यांनी १९६३ पर्यंत या पदी कायम होते. 5 / 6उत्तर कोरियाही १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो. हा देशही पूर्वी जपानच्या ताब्यात होता. दक्षिण कोरियाच्या स्वातंत्र्यानंतर उत्तर कोरियाही स्वतंत्र झाले.6 / 6भारताव्यतिरिक्त दक्षिण कोरियाही या दिवशी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. यापूर्वी हा देश जपानच्या ताब्यात होता, मात्र १५ ऑगस्ट १९४५ रोजी हा देश स्वतंत्र झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications