1 / 9उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज वाढदिवस आहे. दुसरीकडे, योगी आदित्यनाथ यांच्या एका समर्थकाने 'धर्मनगरी' असलेल्या अयोध्येला ७०० किलोमीटरचा पायी प्रवास भेट दिली आणि योगी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. 2 / 9मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या 'जबरा फॅन'ची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दिल्लीतील या तरूणानं योगी आदित्यनाथ यांच्यासाठी अयोध्येपर्यंत पायी 'वारी' केली.3 / 9मूळचा दिल्लीचा रहिवासी असलेल्या साहिल मलिक या तरूणाने २० मे रोजी दिल्लीहून अयोध्येकडे कूच केली. आज सकाळी तो योगी आदित्यनाथ यांच्या जन्मदिवशी अयोध्येत पोहचला. 4 / 9७०० किलोमीटर पायी प्रवास केल्यानंतर साहिल मलिकने हनुमानगढी ते रामजन्मभूमी अशी दंडवत यात्रा काढली.5 / 9जय श्री रामचे नारे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणा देत त्यानं आशीर्वाद घेतले.6 / 9मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवशी साहिलने प्राचीन सिद्धपीठ हनुमानगढी येथे वेद ब्राह्मणांच्या उपस्थितीत विधीपूर्वक पूजा केली.7 / 9पायी प्रवास करणाऱ्या साहिलने सांगितले की, हा प्रवास २२ मे रोजी दिल्लीहून सुरू करण्यात आला होता. 8 / 9तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दीर्घायुष्यासाठी ही यात्रा सुरू करण्यात आली होती, जी ५ जून रोजी पवित्र नगरी अयोध्येत पोहोचून संपली, असंही साहिलनं सांगितलं.9 / 9तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दीर्घायुष्यासाठी ही यात्रा सुरू करण्यात आली होती, जी ५ जून रोजी पवित्र नगरी अयोध्येत पोहोचून संपली, असंही साहिलनं सांगितलं.