'Onam' festival
'ओणम' सणाचा उत्साह By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 1:19 PM1 / 6दक्षिण भारतामधील केरळमध्ये ओणम सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 2 / 6केरळमध्ये या दिवशी सजलेले हत्ती, छोट्या-मोठ्या बोटी, संगीत, पारंपरिक लोकनृत्य व वेगवगेळ्या कलेच्या सादरीकरणात हा सण पार पडतो.3 / 6केरळ वासियांसाठी ओणम हा महत्वपूर्ण पर्व असून याची धूम देशातील सर्व कानाकोपऱ्यात दिसून येते. सणादरम्यान मंदिरासह घरात पारंपारिक मान्यतानुसार पूजापाठ केला जातो. 4 / 6ओणम या सणामध्ये स्नेक बोटींची शर्यत म्हणजेच 'अर्नामुल्ला वल्लामकली'चे मोठे वैशिष्टय आहे.5 / 6'पुक्कलम्' म्हणजेच फुलांनी काढलेली रांगोळी हेही या सणाचे एक खास आकर्षण मानले जाते. रंगीत अशा सुवासिक फुलांनी सजवलेली ही रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेते.6 / 6ओणम सणाची परंपरा ही जुन्या काळापासून चालत आली आहे. या सणावेळी घरात लज्जतदार पदार्थ बनवले जातात. तसेच, यावेळी केळीच्या पानात जेवण वाढले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications