one nation one ration card scheme will be launched from1 june rkp
उद्यापासून ‘वन नेशन वन रेशन कार्ड’; 'असा' होणार बदल! By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 3:35 PM1 / 10मुंबई : देशभरात उद्यापासून म्हणजेच 1 जूनपासून ‘वन नेशन वन रेशन कार्ड‘ ही योजना लागू होणार आहे. 2 / 10या योजनेमुळे रेशन कार्डधारक देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातून सरकारने ठरवलेल्या दरात अन्नधान्य विकत घेऊ शकणार आहेत.3 / 10आतापर्यंत रेशन कार्ड धारक ज्या जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड तयार करत त्याच जिल्ह्यात त्यांना रेशन घेता येत होते. परंतु, आता आता सर्व लाभार्थ्यांना देशभरातील कोणत्याही ठिकाणावरुन रेशन घेता येणार आहे.4 / 10सुप्रीम कोर्टाने देशात अशा प्रकारची योजना लागू व्हावी यासाठी केंद्र सरकारला आदेश दिले होते. अखेर ही योजना 1 जून पासून संपूर्ण देशभरात लागू होत आहे.5 / 10‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जोडण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. 6 / 10यासाठी ओडिसा, मिझोरम आणि नागालँड ही ३ राज्ये देखील तयार होत आहेत. एकूण २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेच्या शुभारंभासाठी सज्ज असणार आहेत.7 / 10‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत पीडीएस मशीनद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटवली जाईल. पीडीएस मशीनच्या आधारे लाभार्थ्यांना ओळखले जाईल. या योजनेसाठी सरकारला सर्व रेशन दुकानांवर पीडीएस मशीन बसवावी लागेल.8 / 10या योजनेसाठी नवे रेशनकार्ड बनवायची किंवा जुनं रेशन कार्ड जमा करण्याची आवश्यकता नाही. लाभार्थी आपल्या जुन्या रेशन कार्डमार्फतही योजनेचा लाभ घेऊ शकतात. 9 / 10रेशन कार्ड दोन भाषांमध्ये राहतील. पहिली म्हणजे स्थानिक भाषा आणि दुसरी भाषा ही हिंदी किंवा इंग्रजी असेल. 10 / 10या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला 3 रुपये किलोने तांदूळ तर 2 रुपये किलोने गहू मिळतील. दरम्यान, ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही, ते ऑनलाईन अर्ज दाखल करुन रेशन कार्ड मिळवू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications