झंडा उँचा रहे हमारा... भारतीय सैन्याने 18 हजार 300 फूट उंचीवर फडकवला तिरंगा By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 11:09 AM
1 / 10 देशभरात आज 75 व्या स्वातंत्र्य दिनाचा (Celebration 15th Auguest 2021) उत्साह पाहायला मिळत आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 2 / 10 नवी दिल्लीसह देशभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. 3 / 10 भाषणाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य महापुरुषांना आदरांजली वाहिली आहे. 4 / 10 देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा (Happy independence day 2021) दिल्या आहेत. 'हे वर्ष नवीन ऊर्जा, चेतना घेऊन येईल' असं मोदींनी म्हटलं आहे. 5 / 10 नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 'आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 6 / 10 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद!' असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 7 / 10 टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून देशाला पदके जिंकून देणाऱ्या खेळाडूंचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. 8 / 10 शाळा असो कि पंचायत, गावातील ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीच्या लालकिल्ल्यापर्यंत तिरंगा फडकला. यासोबतच राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण देशभक्तीमय बनलं आहे. 9 / 10 देशाच्या तिन्ही सैन्य दलाकडूनही तिरंग्याला सलामी देण्यात आली. सैन्य दल, वायू दल आणि नेव्ही दलातील जवानांनी तिरंगा फडकावत तिरंग्याला सॅल्यूट केला. 10 / 10 डोंक्याला येथे 18,300 फूट उंचीवर सैन्यातील जवानांनी तिरंगा फडकवला. संरक्षण दलाचे प्रवक्ते भारतभूषण बाबू यांनी येथे 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा झाल्याचे सांगितले. आणखी वाचा