The Padma Shri award is not mine but farm, kaali aai, Says rahibai popare
'हा 'पद्मश्री' पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा' By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 12:47 PM1 / 9पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा, व समाजाचा असल्याच्या भावना पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपरे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात झालेल्या सत्कारासमयी व्यक्त केल्या.2 / 9मंगळवारी सायंकाळी ‘बीजमाता’ राहीबाई पोपरे यांनी राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली. 3 / 9परिचय केंद्राच्या जनसपंर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन श्राीमती पोपरे यांचा सत्कार केला. 4 / 9याप्रसंगी अन्नमाता ममताबाई भांगरे, बायफ इन्स्टीट्यूट फॉर सस्टेनेबल लाइव्हलीहूड ॲण्ड डेव्हलपमेंटचे विशेष तज्ज्ञ संजय पाटील, विभागीय अधिकारी जितीन साठे, योगेश नवले आणि लक्ष्मण डगळे सोबत होते. माहिती अधिकारी अंजु निमसरकार यांच्या सह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.5 / 9सोमवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राहीबाई पोपरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.6 / 9राहीबाई पोपरे यांनी आतापर्यंत 54 पिकांच्या 116 वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे. प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्लच्या प्रतिक्रिया देताना श्रीमती पोपरे म्हणाल्या, हा पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा, माझ्या बीयांचा, निसर्गाचा आणि आपल्या समाजाचा आहे, अशा भावना व्यक्त केल्या. 7 / 9मागील 25 वर्षांपासून देशी बीया घरी जतन करत असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती जगाला व्हावी म्हणून बायफ संस्थेची मोठी मदत झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 8 / 9यासोबतच गावपातळीवर कळसुबाई समिती स्थापन झाली असून सद्या संस्थेच्या सहाय्याने 3 हजार महिलांसोबत हे काम सुरू असल्याची माहिती पोपरे यांनी यावेळी दिली.9 / 9ज्या प्रकारे गावरान बीज बँक अहमदनगर जिलह्यात झाली आहे अशाचप्रकारे गावोगावी अशा बीज बँका निर्माण व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आणखी वाचा Subscribe to Notifications