शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रणनीती! ७६ वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या ज्येष्ठ नेत्याची मुलगी भाजपात जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 10:30 AM

1 / 10
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी एक्शन मोडवर आली आहे. प्रत्येक राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं भाजपानं लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीनेच भाजपा अनेक प्लॅनिंगवर काम करत आहे. इतर पक्षातील दिग्गज अथवा त्यांच्या घरातील व्यक्तींना भाजपात प्रवेश दिला जात आहे.
2 / 10
केरळमध्ये यंदा पक्षाचे खाते उघडण्यासाठी भाजपाने जोर दिला आहे. त्यासाठी पक्षाने दुसऱ्या पक्षातील घराण्यात फूट पाडून अनेक मोठ्या चेहऱ्यांना पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्रांनुसार, काँग्रेस नेते एके अँटनी यांच्या मुलाला पक्षात प्रवेश दिल्यानंतर आता आणखी एका नेत्याच्या मुलीला भाजपा पक्षात खेचण्याचा प्रयत्न करत आहे.
3 / 10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के करुणाकरण यांची मुलगी पद्मजा वेणुगोपाल यांना भाजपा पक्षात घेऊ शकते. केरळ काँग्रेसची पदाधिकारी पद्मजा वेणुगोपाल यांचा कुठलाही निवडणुकीचा उल्लेखनीय रेकॉर्ड नाही. परंतु त्यांना भाजपात प्रवेश दिल्यास निश्चित राज्यात पक्षाला फायदा होऊ शकतो असं भाजपा नेत्यांना वाटते.
4 / 10
पद्मजा वेणुगोपाल या तिनदा निवडणुकीत हरल्या आहेत. २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत तर २०१६, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभव सहन करावा लागला. त्यामुळे आता त्या भाजपाच्या वाटेवर असून त्यांना लोकसभेची संधी दिली जाऊ शकते असं सांगण्यात येते.
5 / 10
माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांच्या कार्यकाळात के करुणाकरन यांना किंग मेकर म्हणून ओळखले जात होते. त्यांची मुलगी पद्मजा त्रिशूर जिल्ह्यातील कुनंगनन परिसरात राहतात. मुरली मंदिरम हा त्यांचा बंगला फेमस आहे. हा बंगला त्यांच्या वडिलांचा आहे.
6 / 10
पद्मजा वेणुगोपाल यांचे पती राजकारणात नाही. ते एक डॉक्टर आहेत. पद्मजा या नायर समुदायातून येतात. पद्मजा यांचे वडील करुणाकरन हे स्वातंत्र्य संग्रामापासून चळवळीत काम करत होते. पुढे ट्रेड युनियनमध्ये सक्रीय झाले. मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला.
7 / 10
के करुणाकरन हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निकटवर्तीय होते. इतकेच नाही ते केरळचे ४ वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. तर २ वेळा लोकसभेत आणि ३ वेळा राज्यसभेत खासदार म्हणून करुणाकरन यांनी काम सांभाळले आहे.
8 / 10
करुणाकरन यांचे नाव काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये येते, कारण ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे जवळचे होते. काँग्रेसचे चाणक्य म्हणूनही ते प्रसिद्ध होते. केरळच्या राजकारणात के करुणाकरन यांच्या राजकारणाचा दबदबा होता.
9 / 10
अशा दिग्गज काँग्रेस नेत्याची मुलगी पद्मजा गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होती. केरळ राज्यसभेच्या जागेसाठी पक्षनेतृत्व संधी देईल असं त्यांना वाटत होते. परंतु काँग्रेसनं ही जागा मित्रपक्षाला सोडली. त्यामुळे पद्मजा नाराज झाल्या. त्यानंतर अलीकडेच भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासोबत त्यांची भेट झाली असून त्या भाजपात प्रवेश करतील असं मानले जाते.
10 / 10
इंडिया टीव्ही, सीएनएक्सच्या सर्व्हेनुसार, केरळमध्ये यंदा भाजपा लोकसभा निवडणुकीत ३ जागांवर विजय मिळवू शकते. या सर्व्हेत सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील असा अंदाज आहे. केरळमध्ये काँग्रेस ७ जागांवर विजयी होऊ शकते. तर सीपीएम ४, सीपीआय १ आणि मुस्लीम लीग यांना २ जागांवर विजय मिळू शकतो.
टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४