Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 14:54 IST
1 / 9जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या हल्ल्याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. रेकी केल्यानंतर दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणली. या हल्ल्यात सहा दहशतवादी सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. १ ते ७ एप्रिल दरम्यान हल्लेखोरांनी या भागाची रेकी केल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर सुरक्षा दलांना नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल सापडली आहे. 2 / 9दहशतवाद्यांनी याचा वापर केला असावा असा अंदाज आहे. पहलगाम हल्ल्याबाबत गुप्तचर सूत्रांनी मोठा खुलासा केला आहे. एकूण सहा दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणली. टीआरएफ कमांडर सैफुल्लाहने हल्ल्याचा कट रचला आहे.3 / 9मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून २६ जणांची निर्घृण हत्या केली. लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले, त्यांची ओळखपत्रे तपासली आणि नंतर ते हिंदू असल्याचे कळल्यानंतर त्यांना गोळ्या घालून ठार मारले. २६ मृतांपैकी बहुतेक पर्यटक आहेत, तर दोन परदेशी आणि दोन स्थानिक नागरिक आहेत.4 / 9या हल्ल्यात सुमारे २० जण जखमी झाले आहेत. सरकारने आतापर्यंत फक्त १६ मृत्यूंची पुष्टी केली आहे. तर सुरक्षा यंत्रणांनी काल रात्री उशिरा काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.5 / 9३ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्री अमरनाथ यात्रेपूर्वी झालेल्या या भ्याड हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संलग्न असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने स्वीकारली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.6 / 9हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून परतले आहेत. पंतप्रधान मोदींनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी सौदी अरेबियाहून विमानतळावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर चर्चा केली. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून संवाद साधला.7 / 9अमित शाह यांनी तातडीने त्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि नंतर श्रीनगरला पोहोचले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अतिरेकी दुपारी ३ वाजता बैसरन व्हॅलीमधील एका गवताळ शेतात घुसले आणि त्यांनी खाद्यपदार्थांच्या दुकानांभोवती फिरणाऱ्या आणि घोड्यांवर स्वार होणाऱ्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला.8 / 9मृतांमध्ये कर्नाटकातील शिवमोगा येथील व्यापारी मंजुनाथ राव यांचा समावेश आहे. मंजुनाथ यांच्या पत्नीने सांगितले की, दहशतवाद्यांनी तिच्या पतीच्या डोक्यात गोळी झाडली. मी त्यांना म्हणाले, तुम्ही माझ्या नवऱ्याला मारले, मलाही मारून टाका. यावर दहशतवादी म्हणाले- आम्ही तुम्हाला मारणार नाही, जाऊन मोदींना हे सांगा. 9 / 9गृहमंत्री अमित शहा मंगळवारी रात्री उशिरा श्रीनगरला पोहोचले. ते विमानतळावरून थेट राजभवनात गेले आणि त्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन आणि गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका यांच्यासोबत बैठक घेऊन सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.