कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 11:41 IST
1 / 7जम्मू काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाम येथे मंगळवाळी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून सुमारे २६ पर्यटकांची हत्या केली होती. या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून तसेच कलमा पढण्यास सांगून पर्यटकांवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र या हल्ल्यावेळी कलमा पढल्याने प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य या व्यक्तीचे प्राण वाचले. त्यानंतर दहशतवादी कलमा पढण्याची सक्ती का करतात, तसेच कलमा म्हणजे नेमकं काय, हे आपण आज जाणून घेऊयात. 2 / 7 पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहतवाद्यांनी पर्यटकांची धार्मिक ओळख पटवून हत्या केली होती. या हत्याकांडातून चातुर्यामुळे बचावलेल्या प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य यांनी सांगितले की, माझ्या आजू बाजूला प्रत्येक जण कलमा पढत होता. तेवढ्यात एका दहशतवाद्याने माझ्यावर बंदूक रोखली. माझं बोलणं ऐकलं आणि निघून गेला. मी केवळ ‘’ला इलाही’’ चा जप करत होतो. 3 / 7 साधारणपणे १४५० वर्षांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांनी इस्लामच्या अनुयायांसाठी कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज या पाच तत्त्वांचा उपदेश केला. यातमधील पहिला उपदेश हा ‘कलमा’बाबत आहे. इस्लाममध्ये कलमा याचा अर्थ शहादत म्हणजेच शपथ असा होतो. तसेच इस्लामच्या अनुयायांसाठी तो महत्त्वपूर्ण आहे. 4 / 7कलमामधून एकेश्वरवाद म्हणजेच अल्लाहा का एकच असल्याचे आणि तसेच मोहम्मद पैगंबर हे त्याचे प्रेषित आहेत, असे सांगण्यात आले आहे. मुस्लिम बनण्यासाठी केवळ एकादा पूर्ण श्रद्धेने कलमा पढणे पुरेसे आहे, असे मानले जाते. 5 / 7 कलमाला इस्लाममध्ये महत्त्वपूर्ण स्थान असून, इस्लामची दीक्षा घेण्यासाठी पहिला कलमा तय्यब पढणं आवश्यक आहे. कलमामध्ये ‘ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदूं रसूल अल्लाह’, या ओळी पढल्या जातात. यामधील पहिल्या ओळीचा अर्थ अल्लाह शिवाय दुसरा कुणीही ईश्वर नाही, असा होतो. तर दुसऱ्या ओळीचा अर्थ मोहम्मद हे अल्लाहचे पैगंबर आहेत, असा होतो. 6 / 7याशिवाय शिया मुस्लिम कलमामध्ये आणखी एक ओळ असते. अलीयून वलिउल्लाह. या ओळीचा अर्थ अली हे अल्लाहचे प्रतिनिधी आहेत, असा होतो. जगभरातील इस्लाम धर्माचे अनुयायी असलेले सुन्नी आणि शिया हे कलमा पढतात. तसेच इस्लाममध्ये कलमा पढणं ही सामान्य धार्मिक बाब आहे. 7 / 7 दरम्यान, जगातील अनेक इस्लामिक देशांनी आपल्या ध्वजांवर कलमाला स्थान दिलेलं आहे. त्यामध्ये अफगाणिस्तान, सौदी अरेबिया आदी देशांचा समावेश आहे.