शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

परेड सावधान... दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनातही 'महाराष्ट्र दर्शन'

By महेश गलांडे | Published: January 26, 2021 12:50 PM

1 / 11
२६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी ‘महाराष्ट्राच्या संत परंपरे’वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाची कलाकृती सादर करण्यात आली. महाराष्ट्रासह अन्य निवड झालेल्या राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी झाले होते.
2 / 11
कँटॉन्मेंट परिसरातील रंगशाळेत महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैविध्यपूर्ण काम पूर्णत्वास आले असून यंदाच्या चित्ररथावरील प्रतिकृती खास आकर्षण ठरली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने प्रजासत्ताकदिनी राजपथावर राज्याच्या अस्मितेचे दर्शन पुन्हा एकदा घडले
3 / 11
यंदा प्रदर्शित होणाऱ्या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते. मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारलेल्या शेतकऱ्यांनी आमच्या आंदोलनास देशातील सर्वच राज्यांचा पाठिंबा असल्याचे दर्शवले आहे.
4 / 11
आंदोलक शेतकऱ्यांनी गणतंत्र किसान रॅलीचे आयोजन करुन विविध राज्यांची संस्कृती आणि कलाकृती ट्रॅक्टरवरुन दर्शवली. तसेच, तेथील शेतकरी जीवनाचेही सादरीकरणर दिल्ली बॉर्डरवर पाहायला मिळाले.
5 / 11
सिंघु बॉर्डर, टिकरी बॉर्डर, गाज़ीपुर बॉर्डर, धंसा बॉर्डर, चिल्ला बॉर्डरसह हरयाणातील आणखी 4 बॉर्डरवर या शेतकरी संचलनाची परेड झाली. शाहजहांपूर येथून ही गणतंत्र परेड निघणार असून 20 ते 25 राज्यांचे पथसंचलन होईल, असे आंदोलक नेते योगेंद्र यादव यांनी सांगितले होते.
6 / 11
दिल्लीमध्येप्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर मार्च काढला आहे. याला पोलिसांनी परवानगी दिलेली असली तरीही काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा प्रकार घडला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ते अडविले आहेत.
7 / 11
अनेक ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांचे जत्थे आमने-सामने आले आहेत. अक्षरधामच्या आधी एनएच 24 वर शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड तोडले आहेत. यामुळे पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला
8 / 11
दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अक्षरधामच्या आधी पोलिसांनी बॅरिकेड लावले होते. मात्र, काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने बॅरिकेड तोडून दिल्लीकडे घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज करत या शेतकऱ्यांना माघारी जाण्यास भाग पाडले.
9 / 11
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या परेडमध्येही विविध राज्यांच्या कलाकृती आणि संस्कृती झळकल्या आहेत. महाराष्ट्राची संस्कृतीही शेतकऱ्यांच्या आंदोलनात पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ट्रॅक्टरवर दिसून आला, जो ट्रॅक्टर किसान गणतंत्र रॅलीत अग्रेसर होता.
10 / 11
दिल्लीतील किसान परेडमध्ये राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, ओडिशा यांसह विविध राज्यांच्या संस्कृतीचं आणि शेतीचं सादरीकरण होतं.
11 / 11
आंदोलक आणि स्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांनी आपल्या टविटर अकाऊंटवरुन याचे फोटो शेअर केले आहेत.
टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपRepublic Dayप्रजासत्ताक दिनShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज