शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शाळेच्या WhatsApp ग्रुपवर पालकांकडून अश्लील व्हिडिओ, उडाली खळबळ अन् मिळाला कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 6:13 PM

1 / 8
दिल्लीत एका मुलाच्या ऑनलाइन क्लास (स्कूल) व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लील व्हिडिओ (पोर्न) पाठविण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली. हा व्हिडिओ मुलाच्या पालकांकडून चुकून पाठविण्यात आला, असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 8
तसेच, अनेक शाळांकडून याबाबत तक्रार आल्यानंतर उत्तर दिल्ली महानगरपालिकेने अशा पालकांना सावधान केले असून त्यांनी पुन्हा अशी चूक केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
3 / 8
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, नाव न सांगण्याच्या अटीवर जहांगीरपुरी येथील एका शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, 'आम्हाला गेल्या महिन्यात इयत्ता पाचवीतील व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप मिळाली होती.'
4 / 8
क्लिप विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावरून पाठविण्यात आली होती. आम्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलाविले. दरम्यान, त्यांनी असे कोणतेही व्हिडिओ पाठविण्याबाबत नकार दिल्याचे जहांगीरपुरी येथील शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.
5 / 8
ते म्हणाले, आमचे शिक्षक नियमितपणे अशा ग्रुप्समध्ये मेसेज पाठवतात, जे पालकांना विनंती करतात की, ऑनलाइन क्लासशी संबंधित कोणत्याही प्रश्नांशिवाय इतर काहीही ग्रुप्स शेअर करू नये. आता आम्ही शिक्षण विभागाने काढलेला हा आदेश शेअर केला आहे.
6 / 8
शाळांकडून अश्लील मेसेज पोस्ट केल्याचे आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी तयार केलेल्या ग्रुप्समध्ये अश्लील व्हिडिओ-फोटो प्रसारित केल्याच्या तक्रारीनंतर उत्तर दिल्ली महानगरपालिकेने अशा कोणत्याही कृतीसाठी जबाबदार आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
7 / 8
उत्तर दिल्ली महानगरपालिका संस्थेच्या शिक्षण विभागाने नरेला झोनमधील एका शाळेची तक्रार आल्यानंतर हा इशारा दिला आहे.
8 / 8
अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास आरोपी पालकांवर कोणताही उशीर न करता एफआयआर दाखल करावा, असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षणWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपdelhiदिल्ली