शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संसद घुसखोरी प्रकरण; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, CISF कडे दिली संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 2:48 PM

1 / 6
Parliament Security Breach: संसदेच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (CISF) सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत दिल्ली पोलीस संसदेची सुरक्षा सांभाळत होते. आता गृह मंत्रालयाच्या निर्णयानुसार, संपूर्ण संसद भवनाची सुरक्षा CISF पाहणार आहे.
2 / 6
CISF हा केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचा (CAPF) एक भाग आहे, जो आण्विक आणि एरोस्पेस डोमेन, नागरी विमानतळ आणि दिल्ली मेट्रोमधील आस्थापनांचे रक्षण करतो. याशिवाय दिल्लीतील अनेक केंद्रीय मंत्रालयांच्या इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारीही सीआयएसएफकडे आहे. आता सरकारच्या निर्णयानंतर संसदेच्या सुरक्षेची जबाबदारीदेखील सीआयएसएफकडे आली आहे.
3 / 6
गृहमंत्रालयाने सीआयएसएफला संसद भवन परिसराचे एकदा सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात केंद्र सरकारच्या मंत्रालयांचे संरक्षण करणाऱ्या CISF च्या गव्हर्नमेंट बिल्डिंग सिक्युरिटी (GBS) युनिटचे तज्ञ आणि सध्याच्या संसद सुरक्षा दलाचे अधिकारी मदत करतील. या टीममध्ये CISS अग्निशमन आणि बचाव अधिकारी देखील सामील असतील.
4 / 6
संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी लोकसभेवर असते, लोकसभा अंतर्गत सुरक्षा व्यवस्था हाताळते. दोन्ही सभागृहे म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा यांचे स्वतःचे सुरक्षा कर्मचारी आहेत, ज्यांना संसद सुरक्षा सेवा (PSS) म्हणून ओळखले जाते. एकूणच या सेवेचे काम संपूर्ण सुरक्षा व्यवस्था करण्याचे असेल. जेव्हा संसदेचे अधिवेशन चालू नसते आणि सभागृहातील हालचाल बंद असते तेव्हा ही सेवा अधिक सक्रिय असते.
5 / 6
अधिवेशन काळात सुरक्षा आणखी वाढवली जाते. सत्रादरम्यान सुरक्षेसाठी दिल्ली पोलीस कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), इंडो-तिबेट पोलीस दल (ITBP) तैनात असतात. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी इंटेलिजन्स ब्युरो, एसपीजी, एनएसजीचे जवानही संसद भवनात उपस्थित आहेत.
6 / 6
2001 च्या संसदेवरील हल्ल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. संसदेची सुरक्षा हायटेक पद्धतीने केली जाते. काही रस्ते आणि दरवाजे बंद करण्यात आले आहेत. संसदेच्या कर्मचार्‍यांनाही प्रवेश करण्यासाठीही पास आवश्यक आहे. संसद भवन परिसराच्या आजूबाजूला सुरक्षा असतेच, मात्र संसद भवनाबाहेर आणि त्याला लागून असलेल्या रस्त्यांवरही नेहमीच पोलिस तैनात असतात.
टॅग्स :Parliamentसंसदdelhiदिल्लीPoliceपोलिसIndian Armyभारतीय जवानAmit Shahअमित शाहHome Ministryगृह मंत्रालय