शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pashupatinath Temple: भलेभले इंजिनिअर, अधिकारी थकले! अशिक्षित मेस्त्रीने काही मिनिटांत अडीज टनांचे शिवलिंग पिंडीवर बसवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 9:48 PM

1 / 9
मंदसौरच्या प्रसिद्ध भगवान पशुपतिनाथ महादेव मंदिरामध्ये सहस्त्रेश्वर महादेव शिवलिंग स्थापन करण्यात आले. हे शिवलिंग काही किलोंमध्ये नाही तर जवळपास अडीज टन वजनाचे, साडे सहा फूट उंचीचे आणि तेवढ्याच गोलाकार आकाराचे होते.
2 / 9
शिवलिंग अभिषेकाचे पाणी वाहून नेणाऱ्या पिंडीवर बसवायचे होते. आतमध्ये होल होता, त्यात ते आतमध्ये जावे लागणार होते. परंतू एवढे जड शिवलिंग कसे स्थापित करायचे यावर इंजिनिअर, अधिकारी आणि तज्ज्ञांची चर्चा सुरु झाली.
3 / 9
अक्षरश: जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पीडब्ल्यूडीचे अधिकारी, स्थापत्य विभागाचे इंजिनिअर यासह जेवढे जेवढे हुशार अधिकारी होते त्यांना पाचारण केले. हे शिवलिंग क्रेनच्यामदतीने त्या होलमध्ये उतरवायचे होते. सर्वांची चर्चा सुरु झाली, असे केले तर, तसे केले तर. परंतू कोणालाच हे शिवलिंग कसे स्थापित करावे हे समजत नव्हते.
4 / 9
या अधिकाऱ्यांची चर्चा तिथे शेजारी काम करत असलेला मकबूल नावाचा मेस्त्री ऐकत होता. त्याने जिल्हाधिकाऱ्यांना मार्ग सांगितला. तो ऐकून सारे अचंबित झाले. भले भले इंजिनिअर जिथे फेल झाले तिथे या मेस्त्रीने एका झटक्यात समस्या दूर केली.
5 / 9
मकबुलने सांगितले, जिथे हे शिवलिंग स्थापित करायचे आहे, त्या जागी बर्फ ठेवा, त्यावर शिवलिंग ठेवा. बर्फ जसजसा वितळत जाईल तसतेसे शिवलिंग पिंडीच्या आतमध्ये सरकत जाईल. यामुळे ना शिवलिंगाला हानी पोहोचेल ना पिंडीला. हे एकून सारे अवाक् झाले.
6 / 9
मकबूल कोण होता, एक मेस्त्री. त्याने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला आणि शक्कल लढविली. ज्यासाठी इंजिनिअर तासंतास त्रस्त होते ती समस्या त्याने काही मिनिटांत सोडविली. शिव सहस्त्रेश्वर महादेवांचे शिवलिंग मकबूलने सांगितल्या प्रमाणेच बर्फ आणून स्थापित करण्यात आले.
7 / 9
मकबूल कोण होता? मंदिर परिसरात काम करणारा एक मेस्त्री कारागिर एवढीच त्याची ओळख. सिमेंट, रंगाने माखलेले कपडे. तो कधीही शाळेत गेला नव्हता. या घटनेवर मकबूल म्हणतात की, अल्ला, ईश्वर एकच आहे. माझ्या हातून हे पुण्याचे काम झाले याचा मला आनंद आहे.
8 / 9
भगवान पशुपतिनाथ महादेव मंदिराच्या समितीवर अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी गौतम सिंह यांनी सांगितले की, खूप मेहनत करावी लागली असती. खूप सल्लामसलत केली. सर्व इंजिनिअरना देखील बोलविले. परंतू शिवलिंग कसे स्थापित करायचे हे ते सांगू शकले नाहीत. मकबूल भाईंनी हे काम झटक्यात करून टाकले. असे वाटले की त्यांना देवानेच पाठविले होते.
9 / 9
पशुपतीनाथ महादेवाप्रमाणेच सहस्त्रेश्वर महादेव शिवलिंगही शिवना नदीतून प्रकट झाले होते. अनेक वर्षे ते मंदिराच्या आवारात ठेवण्यात आले होते. आता त्याची मंदिर परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन मंदिरात त्याची स्थापना करण्यात येत आहे.
टॅग्स :TempleमंदिरMadhya Pradeshमध्य प्रदेश