शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : पतंजलीच्या कोरोनिलला अखेर आयुष मंत्रालयाची मान्यता; पण घातली महत्त्वाची अट…

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 8:20 AM

1 / 10
कोरोनावरच्या उपचारासाठी पतंजलीनं तयार केलेलं कोरोनील औषध सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. कोरोनीलवरून वाद वाढत असल्याचं पाहिल्यानंतर पतंजलीनं यू-टर्न घेतला होता.
2 / 10
आम्ही कोरोनावरील कोणतंही औषध तयार केलं नसल्याचा दावा पतंजलीनं केला. उत्तराखंड सरकारच्या आयुष विभागाकडून पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली होती.
3 / 10
त्या नोटिशीला दिलेल्या उत्तरात पतंजलीनं कोरोनावर कोणतंही औषध तयार केलंच नसल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे पतंजलीच्या कोरोनिलला काही अटी अन् शर्थींवर अखेर आयुष मंत्रालयानंही मान्यता दिली आहे.
4 / 10
पतंजलीला हे औषध कोरोनाच्या रुग्णांना बरं करणारं म्हणून नव्हे, तर रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं म्हणून विकता येईल, असं आयुष मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
5 / 10
गेल्या काही दिवसांपूर्वीच योगगुरू रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी कोरोनिल औषधाचं लॉन्चिंग केलं होतं. कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करत रामदेव बाबांनी कोरोनिल लॉन्च केलं होतं.
6 / 10
मात्र त्या औषधावरून वाद झाल्यानंतर ते अडचणीत सापडले होते. त्यासाठी आवश्यक परवाना मिळालेला नसल्याचं रामदेव बाबा वादात सापडले होते.
7 / 10
उत्तराखंड सरकारच्या आयुष मंत्रालयानं पतंजलीला नोटीस पाठवली. त्यानंतर रामदेव बाबांनी कोलांटउडी घेतली होती. 'आम्ही कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केलाच नव्हता. कोरोना रुग्ण बरे होतील, असं औषध तयार केल्याचं आम्ही म्हटलं होतं,' असं स्पष्टीकरण पतंजलीकडून उत्तराखंड सरकारला देण्यात आलं आहे.
8 / 10
आम्ही कधीही कोरोनावरील औषधं तयार केल्याचा दावा केला नव्हता, असं पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांनी म्हटलं होतं.
9 / 10
आम्ही सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन औषध तयार केलं होतं. त्या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण बरे झाले. आमच्या औषधामुळे कोरोना रुग्ण बरे होतात, असा दावा आम्ही केला होता.
10 / 10
त्यावर आम्ही आजही ठाम आहोत. या प्रकरणी उत्तराखंड सरकारच्या आयुष मंत्रालयानं दिलेल्या नोटिशीला आम्ही उत्तर दिलं आहे, असं बाळकृष्ण यांनी सांगितलं होतं.
टॅग्स :patanjaliपतंजलीBaba Ramdevरामदेव बाबा